शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

पंतप्रधान आवास, रुग्णालय खासगीकरण, पाणीटंचाईविरोधात नागरिकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 2:05 AM

झोपडपट्टी पुनर्वसन, भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयाचे खासगीकरण, वाकड परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा विविध प्रश्नांवर महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले.

पिंपरी : झोपडपट्टी पुनर्वसन, भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयाचे खासगीकरण, वाकड परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा विविध प्रश्नांवर महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षाचे नेते आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. प्राधिकरणातील मोबाइल टॉवरच्या विरोधात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.दापोडी झोपडपट्टीतील घरांचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन करण्याच्या विकास प्रकल्पाच्या विरोधात जयभीमनगर, लिंबोरे वस्ती, सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. रहिवासी संघर्ष कृती समिती दापोडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी नगरसेविका आणि आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, आरपीआय गटनेत्या सुनीता वाडेकर, देविदास साठे, रवींद्र कांबळे, विनय शिंदे, अकिल शेख, राजू गायकवाड, सुधीर जम, विनोद गनबोटे, सतीश साळवे, सिकंदर सूर्यवंशी, युवराज गायकवाड, संदीप तोरणे, राजीव कांची, सतीश मठ्ठपती, टोनी ठोंबरे आदी सहभागी झाले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.>आंदोलन कशासाठी?जयभीमनगर येथील नागरिकांच्या जागेवर झोपडपट्टीचे आरक्षण टाकून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून दिशाभूल व फसवणूक होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या पुनर्वसन प्रकल्पास त्यांनी विरोध दर्शविला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला जात असल्याने नागरिकांचा विरोध होत आहे. येथील नागरिक अनेक वर्षांपासून येथे स्थायिक आहेत. यावर अनेकांनी दुमजली घरे उभारली आहेत. काहींची जास्त चटई क्षेत्र असलेली घरे असून, त्यांना सरकारकडून केवळ २६९ चौरस फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.>पाणी नाही, मग आम्ही करही देणार नाही!पिंपरी : पाणीटंचाई आणि कचरा प्रश्नी पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. ‘पाणी देत नाही, कचरा उचलत नाही, जा मग आम्ही कर देत नाही’ अशा घोषणा उच्चभ्रू सोसायट्यांतील नागरिकांनी दिल्या. वाकड, पिंपळे निलख परिसरात पाणीटंचाई आणि कचरा प्रश्न गंभीर आहे. पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने या विरोधात आज आवाज उठविला होता. त्यात सत्तारूढ पक्षाचे नगरसेवकही सहभागी झाले होते.या आंदोलनात भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे, राष्टÑवादीचे नगरसेवक मयूर कलाटे सहभागी झाले होते. फेडरेशनचे अध्यक्ष सुदेशराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या वेळी सुधीर देशमुख, सचिन लोंढे, तेजस्विनी सवाई, हेमचंद्र कुरीनल, रोहित सावंत, नितीन पाटील आदी सहभागी झाले होते.‘उतू नका मातू नका, वाकडचे पाणी पळवू नका’, ‘पीसीएमसीची चर्चा भारी टॅक्स घेतात भारी आणि पाणी देताना चोरी, पाणी द्या, पाणी द्या हक्काचे पाणी द्या’ असे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. या आंदोलनात उच्चभ्रू सोसायट्यांचे नागरिक सहभागी झाले होते. सुदेश राजे म्हणाले, ‘‘गृहनिर्माण सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तसेच कचरा प्रश्नही गंभीर आहे. त्यामुळे आंदोलन केले.’’वाकड, पिंपळे निलख या भागातील गृहनिर्माण सोसायट्यांना पिण्याचे पाणी पुरेसे नाही, याबाबत महापालिकेकडे तक्रारी करूनही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी आणि आरोग्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे मयूर कलाटे म्हणाले; तर ‘नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. कचरा प्रश्नही सुटत नाही. आम्हीही नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर आहोत,’ असे तुषार कामठे म्हणाले.>रूग्णालय खासगीकरणास विरोधपिंपरी : महापालिकेने भोसरी येथील नव्याने बांधलेले हॉस्पिटल खासगी संस्थेस देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या महापालिका सभेसमोर हा प्रस्ताव मंजुरीस ठेवला होता. या निर्णयाविरोधात नागरी हक्क सुरक्षा समिती व इतर समविचारी पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरीत आंदोलन करण्यात आले.रुग्णालय खासगीकरणास विविध संस्थांनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेच्या या लोकविरोधी निर्णयाला विरोध करण्यासाठी नागरी हक्क सुरक्षा समिती व इतर समविचारी पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी सकाळी ११ ते दुपारी एकपर्यंत आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्ष, स्वराज अभियान व इतर सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, प्रदीप पवार, गिरीश वाघमारे, नीरजकुमार कडू, शेतकरी कामगार पक्ष पिंपरी चिंचवडचे हरीश मोरे, नितीन बनसोडे, छायावती देसले, ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, वैजनाथ शिरसाट, रयत विद्यार्थी विचार मंचाचे धम्मराज साळवे, संतोष शिंदे, वंदना गायकवाड, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, बारा बलुतेदार महासंघाचे प्रताप गुरव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, अपर्णा दराडे, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे सहभागी झाले होते.