शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन घटूनही भाताचा भाव कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 01:18 IST

तालुक्यात या वर्षी सरासरी भात उत्पादन २३.५० क्विंटल आहे. तर मागील वर्षी सरासरी ३३.५० क्विंटल उत्पादन झाले

कामशेत : या वर्षी तालुक्यात सुमारे १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली होती. पण सप्टेंबर महिन्यात दाणे भरण्याच्या काळात पावसाने खंड दिल्याने भात पिकाच्या उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी घट आली आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले होते. उत्पादन घट आल्याने या वर्षी शेतकºयांना भाताचा बाजार वाढण्याची अपेक्षा होती. मात्र या वर्षी अजूनही भाताचे दर स्थिर आहेत. त्यामुळे भात उत्पादक शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात या वर्षी सरासरी भात उत्पादन २३.५० क्विंटल आहे. तर मागील वर्षी सरासरी ३३.५० क्विंटल उत्पादन झाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मागील वर्षी इंद्रायणी भातास २१०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असा दर होता. तर या वर्षी २२०० ते २४०० प्रति क्विंटल इतका दर आहे. तसेच कोळंब जातीच्या भातास १७०० ते १८०० रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. तर तो मागील वर्षी प्रमाणेच स्थिर आहे आणि आंबेमोहर भाताचा दरदेखील मागील वर्षीप्रमाणेच या वर्षी २५ ते ३० रुपये प्रति क्विंटल असा स्थिर आहे. या वर्षी उत्पादनात घट झाली असूनदेखील भाव स्थिर असल्याने शेतकºयांमध्ये व्यापाºयांच्या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाची भात पिकास १७५० ते १७९० प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत असल्याने व्यापाºयांना दरासंदर्भात शेतकºयांना काही बोलता येत नसल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, भात पिकाची प्रतवारी कशी करावी व त्याची गुणवत्ता कशी तपासली जावी या विषयी शासनाने व्यापाºयांना कोणत्याही प्रकारचे नियम व अटी लावत नसल्याने व्यापारी म्हणेल तीच गुणवत्ता शेतकºयांना मान्य करून आपले धान्य विकावे लागत असल्याची परिस्थिती सध्या तालुक्यात आहे. यामुळे भात पिकाचा दर्जा व गुणवत्ता ठरविण्याची एक नियामक पद्धत शासनाने अवलंबण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.1मावळात सरासरी ४ लाख २८ हजार ८०० क्विंटल इतके भाताचे उत्पादन होत असते. मावळात उत्पादित होणाºया भातास पुणे जिल्ह्यातील लोकांकडून प्रचंड मागणी आहे. त्यात इंद्रायणी तांदूळ लांबीला लहान असल्याने इतरत्र त्यास मागणी कमी आहे. तरीही मावळातील इंद्रायणी तांदूळ खूप प्रसिद्ध आहे.या वर्षी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांत पाऊस कमी प्रमाणात पडल्याने भात पिकाच्या उत्पादनात घट झालेली आहे. यामुळे भाताचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र शेतकºयांची भात विकण्याची घाई यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याचाच फायदा तांदूळ व्यापारी व दलाल यांनी घेतला असल्याचे काही भात उत्पादक शेतकरी सांगत आहेत.मावळ तालुक्यातील भातपीक हे शेतकºयाचे प्रमुख पीक आहे. या पिकाची विक्री केल्यानंतरच हंगामी पिके घेण्यासाठी शेतकरी भांडवलाची निर्मिती करीत असतात. यामुळेच शेतकºयांना धान्य विकण्याची घाई असते. यावर्षी भात उत्पादन ७५ टक्के आहे. शिवाय पिकाचा दर्जाही उत्तम आहे. त्यामुळे भाताला मागणीही खूप आहे. तरीही भाताचे भाव स्थिर असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.सप्टेंबर महिन्यात पावसाने खंड दिल्याने भात उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र पाणी उपलब्ध असणाºया भात उत्पादक शेतक ºयाचे भात उत्पादन उत्तम झाले आहे. काही शेतकºयांनी वेगळे प्रयोग केल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.- देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी