शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीवीर दामोदर चापेकर यांच्या नावाचे टपाल तिकीट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:31 IST

केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली आहे. चापेकरांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित होणे, ही पिंपरी-चिंचवड शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन चिंचवडगाव येथील क्रांतीतीर्थ चापेकरवाडा येथे रविवारी ८ जुलैला दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होणार

पिंपरी : क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते येत्या रविवारी चिंचवड गावातील चापेकर वाडयात टपाल तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत.चिंचवडगाव येथील क्रांतीतीर्थ चापेकरवाडा येथे रविवारी ८ जुलैला दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी  केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे आदी उपस्थित राहणार आहेत. खासदार बारणे याबाबत माहिती देताना म्हणाले, क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांनी १८९७ मध्ये वाल्टर चार्ल्स रॅण्डचा वध केला. रॅन्डचा वध केल्यामुळे इंग्रजानी चापेकर बंधुना फासावर चढविले. स्वातंत्र्य संग्रामासाठी चापेकर कुटुंबातील तीन बंधू शहीद झाले. क्रांतीवीर चापेकरांच्या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशन व्हावे, यासाठी सलग तीन वर्ष पाठपुरावा केला.चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले होते. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आवश्यक ती कागदपत्र उपलब्ध करून देण्यास मदत केली.केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली आहे. चापेकरांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित होणे, ही शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी केली.तिकीटाच्या प्रकाशन सोहळयाच्या निमित्ताने लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेSumitra Mahajanसुमित्रा महाजनgirish bapatगिरीष बापटHansraj Ahirहंसराज अहिर