शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा; कर भरल्याने कंपनीचा लिलाव टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 22:01 IST

पूजा खेडकर यांच्या अटकेबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

ज्ञानेश्वर भंडारे 

पिंपरी : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या तळवडेतील कंपनीने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा भरणा केला आहे. त्यामुळे कंपनीचा लिलाव टळला. दोन लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर आणि एक लाख ७८ हजार रुपयांची पाणीपट्टी भरली आहे.पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून तळवडेतील कंपनीचा पत्ता दिला होता. प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिले होते. या रेशन कार्डवरही याच कंपनीचा पत्ता होता. तळवडे गावठाण, ज्योतिबानगर येथे असलेली थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पूजा यांच्या आई मनोरमा यांच्या नावावर आहे. कंपनीकडे सन २०२२ पासून दोन लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर थकीत होता.

नोटिसीनंतरही कर न भरल्याने १९ जुलै रोजी मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर कराचा भरणा करण्यास २१ दिवसांची मुदत होती. या कालावधीत कर भरला नसता तर कंपनीचा लिलाव केला जाणार होता; परंतु खेडकर कुटुंबीयांनी सहा ऑगस्ट रोजी दोन लाख ८७ हजार ५९१ रुपयांची मालमत्ताकराची थकबाकी भरली आहे. त्याचबरोबर एक लाख ७८ हजार ६८० रुपयांची पाणीपट्टीही भरली आहे. त्यामुळे कंपनीवरील लिलावाची टांगती तलवार टळली आहे.

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरPuneपुणे