शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मावळ व शिरुर मतदारसंघातील मतदान यंत्रे स्ट्राँग रुम' मध्ये सुरक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 09:00 IST

मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या निकषांनुसार सुरक्षा यंत्रणा तैनात, चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे

पिंपरी : मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशिन (मतदान यंत्रे) बालेवाडी शिवछत्रपती क्रीडासंकुलातील स्ट्रॉँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून, २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सुरक्षेचे कडे स्ट्राँगरूमला असणार आहे. एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत. मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्णत्वास आली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस असे तीन टप्पे आहेत. तीनही ठिकाणी तपासणी केली जाते. सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस ओळखपत्राची तपासणी करतात. त्यानंतर राज्य राखीव पोलिसांकडून यंत्रांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे मोबाइल व इतर वस्तूंची तपासणी केली जाते. याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मतमोजणी कक्षात कोणालाही मोबाइल आतमध्ये नेण्यास परवानगी नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान अधिकारी कोणीही मोबाइल आतमध्ये नेऊ शकत नाही.मतमोजणीची तयारी पूर्णत्वासमावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ९२ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी, रनर, कोतवाल असे सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत. मतमोजणी कर्मचाºयांना १६ आणि २२ मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीसाठी १४  टेबल असणार आहेत. तर, पोस्टल मतदानासाठी आठ टेबल अशा एकूण ९२ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वांत मोठा आहे. त्यासाठी जागेची थोडी समस्या आहे. मतमोजणीच्या एका टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक आणि एक शिपाई असे चार कर्मचारी एका टेबलवर असतील. मतमोजणी कर्मचाºयांना प्रशिक्षणईव्हीएम ने-आण करण्यासाठी रनर, स्ट्राँग रूमसाठी, वाहतूक, खानपान सुविधेसाठी, कोतवाल असे एकूण सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणी दिवशी कार्यरत असणार आहेत. पुरेसे कर्मचारी उपलब्ध आहेत. मतमोजणी कर्मचाºयांना १६ आणि २२ मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील पाच ह्यव्हीव्हीपॅटह्ण मशिनची तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळshirur-pcशिरूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक