शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आई काम सांगते म्हणून घरातून निघून गेलेल्या मुलीचा तीन तासांत घेतला पोलिसांनी शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:40 IST

अज्ञात इसमाने १२ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आईने दिली होती फिर्याद

ठळक मुद्देपालकांनी मुलांशी मुक्त संवाद करणे आवश्यक

पिंपरी : आई काम सांगते म्हणून १२ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी शोध घेऊन अल्पवयीन मुलीला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. पिंपळे निलख येथे रविवारी (दि. १५) रात्री हा प्रकार घडला.सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने १२ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रविवारी रात्री नऊच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या ३३ वर्षीय आईने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर परिसर, पुण्यातील बसस्थानके व पुणे रेल्वे स्टेशन येथे ही तपास पथके रवाना करण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकावर रात्री साडेअकराच्या सुमारास एका फलाटावर अल्पवयीन मुलगी दिसून आली. तिच्याकडे चौकशी केली असता, आई काम सांगते म्हणून घरून निघून आल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर तिला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्व साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, हेमा सोळुंके, पोलीस कर्मचारी राजश्री माळी, संध्या नरके, भरत पारधी, बापू पोटे, रवींद्र देशमुख, अरुण नरळे यांनी ही कामगिरी केली............पालकांनी मुलांशी मुक्त संवाद करणे आवश्यक आहे. त्यांच्या आकांक्षा व अपेक्षांना ओळखून त्यांचे समुपदेशन केले पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा. जेणेकरून गैरसमज करून घेऊन मुले चुकीचा निर्णय घेणार नाहीत.ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस