शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

पिंपरीत ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 17:37 IST

ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.

पिंपरी : ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत रोकड तसेच मोबाईल फोन असा एकूण ५१ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी येथे सामाजिक सुरक्षा पथकाने राजश्री लॉटरी सेंटर सोमवारी (दि. ९) दुपारी पावणेचारच्या सुमारास ही कारवाई केली.

मयूर रवींद्र जगताप (वय ३१, रा. काळेवाडी), दत्‍तात्रय रघुनाथ कदम (वय ४२, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव), गोकुळ वामन पाटील (वय ५, रा. रुपीनगर, तळवडे), रुपेश अशोक केसरवानी (वय ४०, रा. यमुनानगर, निगडी), सचिन सुभाष साळुंके (वय ३७, रा. शिवाजीनगर गावठाण, मनपा पाठीमागे, पुणे), विठ्ठल कचरू कांबळे वय ५०, रा. विठ्ठल नगर, नेहरूनगर, पिंपरी), बाबुराव सदाशिव जांभुळकर (वय ५२, रा. हिंजवडी गावठाण), काळूराम बाबू जाधव (वय ५२, रा. काळेवाडी), अनिल नंदलाल राजदेव (वय ४३, रा. रविकिरण सोसायटी, पिंपरी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी राजेश विठ्ठल कोकाटे यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथे आंबेडकर चौकाकडून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या राजश्री लॉटरी सेंटर येथे ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. ऑनलाइन लॉटरी नावाचा जुगार घेऊन ते ऑनलाइन न करता लोकांना कागदी आकड्यांच्या चिठ्ठ्या देऊन त्यावर पैसे स्वीकारले. तसेच तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हारजीत चा जुगार विनापरवाना खेळताना आरोपी मिळून आले. पोलिसांनी या कारवाईत ४३ हजार १६० रूपये रोख, आठ हजार १५ रूपये किमतीचा मोबाईल फोन, असा एकूण ५१ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस