पिंपरी : टोळक्यांची भांडणे सोडवण्यास गेलेल्या पोलिसाला मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. मात्र, फिर्याद विलंबाने दाखल झाली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.विकी शिरीष साठे (वय २३, धीरज गोल्डी अपार्टमेंट, पिंपळे निलख) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल चंद्रकांत इंगवले (वय ३२, रा. शिवाजी चौक, पिंपळे निलख), सुभाष उमेश सोनी (वय २२, रा. पंचशीलनगर, पिंपळे निलख) यांच्यासह सात ते आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई शशिकांत देवकाते यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पिंपळे निलख येथे दोन टोळक्यांमध्ये भांडण सुरू होते. या वेळी पोलीस शिपाई शशिकांत हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता टोळक्यातील काही जण त्यांच्या अंगावर धावून गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी चक्क पोलिसाला मारहाण केली. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस कर्मचा-याला टोळक्यांची मारहाण, आरोपींना अटक, पिंपळे निलखची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:23 IST