शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

करोडपती झालेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा

By नारायण बडगुजर | Updated: October 11, 2023 22:52 IST

ऑनलाईन गेममुळे एका झटक्यात करोडपती झाल्याने आले चर्चेत

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : ऑनलाईन गेममुळे एका झटक्यात करोडपती झालेले पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक सोमनाथ झेंडे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र, ऑनड्युटी असताना ‘गेम’ खेळल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर काही जणांनी केला. त्यामुळे झेंडे यांची चौकशी करण्यात येणार आहे. 

ऑनलाइन गेमच्या माध्यमातून करोडपती झालेले सोमनाथ झेंडे हे चाकण पोलिस ठाणे येथे नेमणुकीस होते. दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक गुन्हा दाखल केला. तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी झेंडे यांनी एकाकडे ८५ हजार रुपयांची मागणी केली होती. झेंडे यांच्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारताना एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. याची दखल घेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी झेंडे यांना तडकफडकी निलंबित केले होते.

दरम्यान, झेंडे यांची नियुक्ती साईड ब्रँच असलेल्या आरसीपी (दंगा काबू पथक) येथे झाली. या पथकाकडून मंगळवारी (दि. १०) उर्से टोल नाका येथे बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यावेळी पथकात असलेल्या झेंडे हे ऑनड्युटी असताना त्यांना ऑनलाईन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागल्याचे समजले.

गृहमंत्र्यांकडे तक्रार

ऑनड्युटी असलेल्या झेंडे यांना बक्षीस लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर झेंडे व्हायरल झाले. त्यावरून झेंडे यांच्यावर आरोप देखील झाले. झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे अमोल थोरात यांनी केली. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत निवेदन दिले.

पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाईबाबत प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासण्यात येतील. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे याबाबत चौकशी करत आहेत. चौकशीनंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल. - सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी

टॅग्स :onlineऑनलाइनPoliceपोलिस