शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या मेडिकलसाठी वणवण, डॉक्टर मिळणे पोलिसांना झाले दुरापास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:04 IST

येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाºया गुन्ह्यांमधील आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून, कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची पोलीसच तक्रार करू लागले आहेत.

कामशेत : येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाºया गुन्ह्यांमधील आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून, कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची पोलीसच तक्रार करू लागले आहेत.कामशेत शहरात शासनाचे पुरस्कार विजेते प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही या आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर नाहीत. शिवाय जे डॉक्टर कार्यरत आहेत ते दुपारी अकरानंतरच गायब होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची तर गैरसोय होतेच आहे. शिवाय एखाद्या गुन्ह्यातील आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वा इतर कारणांसाठी कामशेत पोलिसांची मोठी दमछाक होत आहे.यात कान्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोपीला वैद्यकीय तपासणी करण्यास नेल्यास तेथील वैद्यकीय अधिकारी कामशेतमध्येच करा असेच सूचवतात. या सर्व प्रकारामुळे बहुतेक नेहमीच तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात आरोपींची तपासणी करण्याची वेळ कामशेत पोलिसांवर येत आहे. त्यामुळेच आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी रुग्णालय असूनही त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टरांची नेमणूक करावी शिवाय कार्यरत डॉक्टर हे पूर्ण वेळ उपस्थित असावेत, अशी मागणी नागरिकांसह आता पोलिसांकडूनही होत आहे. या विषयी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना संपर्क साधला असता ते रुग्णालयात उपस्थित नव्हते.फोन करून केली जाते विनंतीसोमवारी दुपारी कामशेत पोलिसांना एकाखुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची वैद्यकीय तपासणीकरायची होती. मात्र नेहमी प्रमाणे कामशेतमधीलसरकारी डॉक्टर उपस्थित नसल्याने वीस ते पंचवीस किलोमीटर लांब असलेल्या तळेगाव येथील सरकारी डॉक्टरांना वैयक्तिक फोन करून विनंती करून ही तपासणी करून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसdoctorडॉक्टर