शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 18:54 IST

दोन जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश

पिंपरी : नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी सोमवारी (दि. ८) अटक करण्यात आलेल्या दोघांना मंगळवारी (दि. ९) मोरवाडी, पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना सोमवार(दि. १५ ) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच याच प्रकरणात यापूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.     आशुतोष सतीश लांडगे (वय ३८, रा. अहमदनगर), जयदीप प्रकाश वानखेडे (वय ३४, रा. पुणे, मूळ रा. श्रीरामपूर ), असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी नवनीत शांतीलाल सूरपुरिया (वय ५५, रा. अहमदनगर) आणि यज्ञेश बबन चव्हाण (वय २५, रा. संभाजीनगर, चिंचवड) या दोघांना अटक केली होती. सूरपुरिया आणि चव्हाण या दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत (दि. ९) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर अर्बन बॅंक फसवणूक प्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली आहे. बॅंकेच्या चिंचवड येथील शाखेत २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbankबँकfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक