शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजनच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 22:09 IST

आरोपींकडून २ गावठी पिस्तुलं व ५ जिवंत काडतुसं जप्त

पिंपरी : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. छोटा राजनच्या सीआर सामाजिक संघटनेचा मावळ तालुका संपर्क प्रमुखाचा यात समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट एकने मंगळवारी (दि. २१) ही कारवाई केली. आरोपींकडून २ गावठी पिस्तुले व ५ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण बाळासाहेब ठाकर (वय २६, रा. दारुंब्रे, ता. मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (वय २८, रा. पांगरी, ता. खेड) व राजू शिवलाल परदेशी (वय ५९, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) यांना अटक केली आहे. आळंदी येथे केळगाव रोडवर एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून चरण ठाकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, प्रदीप खांडगे याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी शोध घेऊन प्रदीप खांडगे यालाही अटक केली. मध्यप्रदेशातून दोन पिस्तूल आणल्याचे खांडगे याने चौकशीदरम्यान सांगितले. त्यातील एक पिस्तूल ठाकर आणि एक पिस्तूल परदेशी यांना विकल्याचे खांडगे याने सांगितले. त्यानुसार राजू परदेशी याला अटक करून त्याच्या घरातून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी चरण ठाकर याच्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेनेचा तो माजी मावळ तालुकाध्यक्ष आहे. तसेच छोटा राजन सामाजिक संघटनेचा मावळ तालुका संपर्क प्रमुख आहे. प्रदीप खांडगे याच्यावरही गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, प्रमोद वेताळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजन