शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत १२ श्‍वानांवर विषप्रयोग; तीन श्‍वानांचा मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: April 14, 2025 22:27 IST

संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : अज्ञात व्यक्तींकडून १२ श्‍वानांवर विषप्रयोग करण्‍यात आला. यापैकी तीन श्‍वानांचा मृत्‍यू झाला. तर सहा श्‍वानांची प्रकृती गंभीर आहे. पिंपरी येथील महिंद्रा ॲनथिया सोसायटीच्या आवारात रविवारी (दि. १३) रात्री साडेदहा ते सोमवारी (दि. १४) सकाळी साडेआठ या कालावधीत ही घटना घडली.

प्रिया बाबुलाल गुगळे (४१, रा. महिंद्रा ॲनथिया सोसायटी, पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १४) संत तुकारामनगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या विरोधात पोलिसांनी भारतीय न्‍याय संहिता कलम ३२५ अन्‍वये प्राण्‍यांना क्रुरतेने वागवण्‍यास प्रतिबंध करण्‍याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (सी) प्रमाणे गुन्‍हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पिंपरी येथील महिंद्रा ॲनथिया सोसायटी ही उच्‍चभ्रू सोसायटी मानली जाते. रविवारी रात्री साडेदहा ते सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्‍या दरम्‍यान कोणीतरी अज्ञात व्‍यक्‍तीने १२ श्‍वानांना काहीतरी विषारी पदार्थ खाण्‍यास दिला. त्‍यामुळे तीन श्‍वानांचा मृत्‍यू झाला. इतर सहा श्‍वानांची प्रकृती चिंताजनक आहे.     या घटनेनंतर श्‍वानप्रेमी व प्राणिमित्रांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. अधिक तपासानंतरच हा प्रकार कोणी केला हे स्पष्ट होईल, असे संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस