शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीएमएल संचालक मंडळाची महापालिकेतील पहिलीच बैठक तहकुब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 17:16 IST

पीएमपीएमएल प्रशासनाकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याने ही बैठक येत्या गुरुवारपर्यंत तहकुब केली आहे.

ठळक मुद्देपीएमपीची बैठक ही महापालिकेत व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी या बैठकीत पीएमपीला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा

पिंपरी :  पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) संचालक मंडळाची पहिली बैठक पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात आज झाली. मात्र, पीएमपीएमएल प्रशासनाकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याने ही बैठक येत्या गुरुवारी सकाळी साडे दहावाजेपर्यंत तहकुब केली आहे. केवळ चर्चेचे गुऱ्हाळ करण्यात आले. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. पीएमपीची बैठक ही महापालिकेत व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यावेळी पीएमपी संचालक मंडळाच्या या बैठकीला संचालक महापौर राहुल जाधव, स्थायी अध्यक्ष विलास मडिगेरी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी अध्यक्ष  सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे, आयुक्त तथा संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.या बैठकीत पीएमपीला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. टाटा मोटर्सकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दोनशे बसपैकी केवळ सहा बस तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट अखेर पीएमपीच्या ताफ्यात या बस दाखल होण्याची शक्यता नसल्याने गुरुवारी होणाऱ्या बैठकीत टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनादेखील याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी बोलविले जाणार आहे.या महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरु करण्याचे नियोजन केले असून, शहरातील पर्यटनस्थळांबरोबरच वारकरी सांप्रदायाच्या देहू-आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यावर चर्चा करण्यात आली. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी आवश्यक असलेला साडे चार कोटींचा निधी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी हिश्यानुसार देण्याचा विचार करावा. मात्र, त्यासाठी पीएमपी प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलावर मध्यम मार्ग कसा काढता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे संचालक मंडळांनी सुचविले. याशिवाय तत्कालीन व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पीएमपीमधील २९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची सुनावणी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत घेतली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे