शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

प्रवाशांच्या तक्रारींची पीएमपी प्रशासनाने अखेर घेतली दखल, कर्मचाऱ्यांना केला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 02:40 IST

पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) वाहतूक व्यवस्थापनाबाबत प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

चिंचवड - पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) वाहतूक व्यवस्थापनाबाबत प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रवाशांना योग्य न्याय मिळत असून, वाहतूक व्यवस्था व कर्मचारी यांना शिस्त लागावी यासाठीपीएमपी प्रशासन योग्य दखल घेत असल्याचे दिसून कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएमपीने दंड केला आहे.पीएमपी सेवेचा वापर करणारे प्रवासी अनेकदा या व्यवस्थेबाबत तक्रारी करीत असतात. बस थांब्यावर बस न थांबविणे, खिडकीच्या काचा तुटलेल्या असणे, आसन व्यवस्थेची मोडतोड, गळके छप्पर, मार्ग फलक नसणे, प्रथमोपचार व अग्निशामक साहित्य नसणे अशा अनेक तक्रारी प्रवासी वारंवार प्रशासनाकडे करित असतात. या तक्रारीची त्वरित दखल घेऊन संबंधित कर्मचाºयाला अथवा ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाते. याचा प्रत्यय शहरातील प्रवाशांना आला. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी पीएमपी प्रशासन विविध प्रकारे जनजागृती करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न करतात. मात्र तरीही रस्त्यावर वाहतूक करणारे वाहक व चालक मनमानी व अरेरावी करीत प्रवाशांना वेठीस धरत असल्याच्या तक्रारी नियमितपणे प्रवासी करीत असतात.शनिवारी सायंकाळी सहा वाजता चिंचवड गावातून निगडीकडे जाणाºया रस्त्यावर इंदिरानगर बस थांब्यावर काही प्रवासी बसची वाट पाहत थांबले होते. यामध्ये तीन दृष्टिहीन महिलांचा सहभाग होता. सहा वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत या मार्गावर तीन बस आल्या. या बसगाड्यांना हात दाखवूनही चालकांनी बस थांबविली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी याबाबत पीएमपी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. बस क्रमांक व मार्ग सांगितला. या तक्रारीची दखल घेत अधिकाºयांनी या मार्गावरील संबंधित बसचालकांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल केला. पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत तक्रार नंबर व केलेल्या दंडाची माहिती प्रवाशांना मेसेजद्वारे पाठविली आहे.टोल फ्री क्रमांक असावापीएमपी प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक टोल फ्री करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. प्रवाशांना तक्रारी करण्यासाठी असणारे क्रमांक टोल फ्री नसल्याने पैसे मोजावे लागतात. कित्येकदा फोन प्रतीक्षेत असल्यास वेळ व पैसे वाया जातात. मात्र या यंत्रणेसाठी खर्च जास्त असल्याचे सांगत हे क्रमांक टोल फ्री केले जात नाहीत.मी व माझ्या दोन मैत्रिणी आम्ही पूर्णत: दृष्टिहीन आहोत. आम्ही कामानिमित्त रोज निगडी ते इंदिरानगर असा प्रवास करतो. कित्येकदा बस थांब्यावर बस थांबत नाहीत. यामुळे रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागते. नागरिक आम्हाला मदत करतात. मात्र काही बसचालक व वाहक आम्हाला सहकार्य करीत नाहीत. यामुळे अनेकदा अडचणी येतात. स्टॉप आल्यावर सांगितले जात नाही. चुकीच्या स्टॉप वर उतरविले जाते. वाहक व चालकांनी आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. - सुनीता पिसाळ, दृष्टिहीन प्रवासीकामानिमित्त आम्हाला रोज प्रवास करावा लागतो. मी दृष्टिहीन असल्याने प्रवासात नागरिकांचे सहकार्य लागते. अनेक नागरिक आम्हाला सहकार्य करतात. काही बसचालक आम्हाला जाणीवपूर्वक चुकीची वागणूक देतात. अशा वेळी आम्ही नागरिकांच्या मदतीने संबंधित बसच्या चालकाची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे करतो. याची दखल घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारामुळे वाहक व चालक या पुढे दृष्टिहीन व्यक्तींबाबत योग्य दक्षता घेतील, अशी अपेक्षा आहे.- सविता घाणेकर, दृष्टिहीन प्रवासी

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड