शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘पिस्तुलधारी’ निघाले लातूरचे ‘उपमहापौर‘ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 20:08 IST

रहदारीच्या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी सतर्कता दाखवित जवळच्या पोलीस स्टेशनला कळवून पोलिसांची जादा कुमक मागविली.

ठळक मुद्दे पिस्तुलाचा परवाना असल्याने त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.

खडकी : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणा प्रचंड सतर्कता बाळगून आहे. थोडीजरी संशयास्पद हालचाल निदर्शनास आली तरी पोलीस यंत्रणा त्याचा मागोवा घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही. गुरुवारी याच सतर्कतेचा प्रत्यय लातूरच्या उपमहापौर महोदयांना आला. घडलेला प्रसंग असा की, रहदारीच्या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी सतर्कता दाखवित जवळच्या पोलीस स्टेशनला कळवून पोलिसांची जादा कुमक मागविली. पिस्तूलधारी महोदयांना काही अंतरावर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात नेत त्यांच्याकडून पिस्तूल ताब्यात घेऊन चौकशी केली. संबंधित दुचाकीस्वाराने दिलेल्या माहितीची खातरजमा केली असता, ती मान्यवर व्यक्ती म्हणजे लातूरचे उपमहापौर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचेही समोर आले. असे असले, तरी खडकी पोलिसांच्या या सतर्कतेचे कौतुक होत आहे. देविदास रामलिंग काळे (वय ४५, रा. गाळेगल्ली, लातूर) असे संबंधित पिस्तूलधारकाचे नाव आहे. काळे हे लातूरचे उपमहापौर आहेत. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी उपमहापौर काळे यांना सोडून दिले. काळे यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याने त्यांच्यावर या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. खडकी पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, खडकी पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप गाडे काम संपल्यानंतर रात्री घरी जात होते. त्या वेळी एक दुचाकीस्वार जाताना त्यांना दिसला. या दुचाकीस्वारासोबत बसलेल्या व्यक्तीचा गाडे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, त्यांनी उपनिरीक्षक मदन कांबळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सहकाºयांसह कांबळे खडकी बाजारातील महात्मा गांधी चौकात दाखल झाले. पुढे एका दुकानाजवळ संबंधित संशयित व्यक्ती थांबला होती. गाडे आणि कांबळे यांनी सहकाऱ्यांसह या दुचाकीस्वारास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तूलही पोलिसांनी काढून घेतले. पोलीस ठाण्यात त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी संबंधित व्यक्तीने पूर्ण सहकार्य केले. मी लातूरचा उपमहापौर देविदास काळे आहे, असे संबंधिताने पोलिसांना सांगितले. त्याची खातरजमा करण्यात आली. काळे यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

टॅग्स :KhadkiखडकीPoliceपोलिसlaturलातूर