शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

पिंपरीचे महापौर बदलाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:53 AM

महापौर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षांचा कालखंड पूर्ण झाला असल्याने महापौरपद बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पिंपरी : महापौर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षांचा कालखंड पूर्ण झाला असल्याने महापौरपद बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी अशा तीनही मतदारसंघांतून इच्छुकांची संख्या अधिक आहे. भोसरीतील संतोष लोंढे यांनी या पदावर दावा केल्याने महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.महापालिकेत सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर होण्याचा मान आमदार महेश लांडगेसमर्थक व चºहोलीचे नगरसेवक नितीन काळजे यांना मिळाला. महापौरपद हे इतर मागासवर्गीय गटास आरक्षित आहे. हे पद सव्वा-सव्वा वर्षे विभागून देण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे.गेल्या वर्षी काळजे यांना महापौरपद, तर आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक सीमा सावळे यांना स्थायी समिती अध्यक्षपद, जुन्या कार्यकर्त्यांपैकी एकनाथ पवार यांना सत्तारूढ पक्षनेतेपद आणि पिंपरी विधानसभेतील शैलजा मोरे यांना उपमहापौरपद दिले होते. काही दिवसांपूर्वी महापौर बदलणार का, असा प्रश्न शहराध्यक्षांना विचारल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचना आल्यानंतर निर्णय घेऊ, असे उत्तर त्यांनी दिले होते. या पदावर सव्वा-सव्वा वर्षे संधी दिली जाणार आहे.।भाजपा निष्ठावंतांचा दावास्थायी समिती सभापतिपद दुसऱ्यांदा चिंचवड समर्थकांना दिले गेले आहे. त्यामुळे महापौरपद पिंपरीला की भोसरीला मिळणार, याबाबत चर्चा रंगली आहे. स्थायी समितीत अन्याय झाल्याने भोसरीला महापौरपद मिळेल, अशीही चर्चा आहे. स्थायी समिती सभापतिपदी डावललेल्या लांडगे गटाच्या राहुल जाधव, संतोष लोंढे; तसेच चिंचवडमधून ज्येष्ठ कायकर्ते नामदेव ढाके, शीतल शिंदे, शस्त्रुघ्न काटे यांच्या नावाची चर्चा आहे. महापौरपदासाठी लोंढे यांनी ओबीसीच्या विविध संघटनांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा पत्रकार परिषद घेऊन केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड