शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पिंपरी : पोलिसांची लक्ष्मण रेषा बनली गुंडाची दहशत कक्षा, दहशतीमुळे रहिवासी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:12 IST

देहूरोड (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीचे शेवटचे टोक, तर परिमंडळ तीन (पिंपरी-चिंचवड) पोलिसांची लक्ष्मण रेषा... त्यामुळे सर्व काही अलबेल आणि अर्थपूर्ण दुर्लक्षित असलेल्या प्राधिकरण सेक्टर क्रमांक २९ चा परिसर अवैध धंद्यांचे आगर बनले असून, येथील वाढत्या गुंडागर्दीमुळे सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड दहशत आहे.

पिंपरी : देहूरोड (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीचे शेवटचे टोक, तर परिमंडळ तीन (पिंपरी-चिंचवड) पोलिसांची लक्ष्मण रेषा... त्यामुळे सर्व काही अलबेल आणि अर्थपूर्ण दुर्लक्षित असलेल्या प्राधिकरण सेक्टर क्रमांक २९ चा परिसर अवैध धंद्यांचे आगर बनले असून, येथील वाढत्या गुंडागर्दीमुळे सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड दहशत आहे.सेक्टर क्रमांक २९, रमाबाई आंबेडकरनगर, जाधव वस्ती, शिंदे वस्ती, आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या आसपासचा सर्व परिसरात बहुसंख्य महाविद्यालये असल्याने हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. मात्र याही गर्दीत व परिसरात वचक बसविण्यासाठी श्रेयवादामुळे गुंडांमध्ये कायम धुसफूस सुरू असते. यातूनच वारंवार भांडणे होऊन तलवारींंचा नाच होतो.देहू पोलिसांचे दुर्लक्ष व काणाडोळा आणि छुप्या पाठिंब्याच्या जोरावर येथील गुंडागर्दी वाढत चालली आहे. २४ तास खुलेआम अवैध धंदे, अवैध धंदेवाल्यांची हप्ता वसुली, त्यातून सततची भांडणे, धिंगाणा, गोंधळ, खून, मारामारी अशा भानगडीमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड दहशतीखाली असल्याचे वास्तव आहे. शिक्षणासाठी येथे विद्यार्थी वास्तव्यास आले आहेत. त्यांच्या सोयीसाठी अनेक हॉस्टेल, होटेल, मेस थाटली गेली. मात्र, रात्रभर हॉटेल व चायनीजच्या नावाखाली बिनबोभाट अनेक धंदे रात्रभर सुरू आहेत, यासह पूल टेबल, हुक्का पार्लर, मद्य, नशिले पदार्थ, पानटपरी, पत्ता क्लब या ठिकाणी २४ तासांत अगदी सहज मिळतात, तर येथील फोअर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंगच्या जागेत ऐन रस्त्यावर आणि हाय टेन्शन खांबाच्या ताराखाली विनापरवाना हॉटेलचा पसारा मांडण्यात आला आहे. येथे पूल टेबल, रात्रभर सुरू असल्यामुळे येणाºया-जाणाºया महिलांना त्रास होतो.येथील टोळीयुद्ध, धुडगूस आणि कायम सुरू असलेली हाणामारी, हुल्लडबाजी यामुळे नागरिकांना वावरणे कठीण झाले आहे. एकीकडे पोलीस सोयीस्कररीत्या डोळेझाक करून कारवाई करीत नाहीत, तर प्राधिकरणाच्या जागेत हॉटेलवर कारवाई होत नाही.पोलीस स्टेशन लांब पल्ल्यावरग्रामीण भागाला आणि लांब पल्ल्याच्या ठिकाणी देहूरोड पोलीस स्टेशन असून, ते लांब असल्याने नागरिकांना मदत घेणे कठीण जाते, तर पोलीस केवळ वसुलीसाठीच येथे आठवड्यातून एक-दोन वेळा फिरकतात असा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिका निवडणुकीत एका कंटेनरमध्ये तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आली. मात्र तिला अद्याप टाळा आहे.अपरात्री साजरे होतात वाढदिवसरात्री-अपरात्री भर रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. मात्र सर्रासपणे केक तलवारीने कापणे हे फॅड या भागात अधिक आहे. तर केक कापून झाल्यानंतर रस्त्यावरच केक, अंडी, तेल इत्यादी टाकले जाते. या धांगड- धिंग्यामुळे महिला व विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. व्यापारी वर्गाकडून हप्ते घेतले जातात. दोन वर्षांपूर्वी गाड्यांच्या व बंगल्यांच्या काचा फोडण्याचे अनेक प्रकार घडले होते. पूल टेबल, तसेच रात्रीचे हॉटेल बंद करणे गरजेचे आहे.लेखी तक्रारीकडे केले जाते दुर्लक्षपिंपरी-चिंचवड शहरात ग्रामीण आणि शहरी दोन्ही पोलिसांच्या हद्दीच्या शेवटी हे ठिकाण असल्याने येथे केवळ सर्व काही अलबेल असल्याचे भासविले जाते; मात्र वास्तव भयानक आहे अनेकदा लेखी तक्रार देऊनही पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे. दोन दिवसांपूर्वी येथे मोठा गोंधळ झाला. यानंतर पोलिसांचे वाहन येथे काही तास उभे होते.

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड