शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीतील प्रदूषित पवना नदीचे वॉटर ऑडिट कागदावरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 13:32 IST

प्रशासनाची टाळाटाळ

ठळक मुद्देतातडीने कार्यवाही अन् उपाययोजनांची आवश्यकतावॉटर ऑडिट आणि नद्यांमधील राडारोडा टाकण्याबाबत उपाययोजना नाही होत ताथवडे येथे पवना नदीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू

विश्वास मोरे - पिंपरी : पवना नदीतील दूषित पाण्यामुळे शेकडो मासे आणि कासवांचा मृत्यू झाला़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांचे वॉटर ऑडिट करावे, अशी मागणी करूनही महापालिका प्रशासनाच्या वतीने कोणतेही ठोस कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. वॉटर ऑडिट आणि नद्यांमधील राडारोडा टाकण्याबाबत उपाययोजना होत नाहीत.ताथवडे येथे पवना नदीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. तसेच नद्यांमध्ये राडारोडा टाकून नदीचे पात्र अरूंद केल्याने या वर्षी पुराचा फटकाही नदीकाठच्या भागातील नागरिकांना बसला होता. पिंपरी-चिंचवड शहरामधून मुळा ११ किलोमीटर, पवना २५ किलोमीटर आणि इंद्रायणी २१ किलोमीटर वाहते. महापालिकेने जलसंपदा विभागाकडून तीनही नद्यांचे सर्वेक्षण करून पूररेषेची आखणी करून घेतली आहे. या पूररेषेमध्ये होणारी अनधिकृत बांधकामे, नदीत टाकलेला राडारोड्यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे. जलप्रवाहाचा नैसर्गिक स्रोत बदलला आहे. या पूररेषेमधील बांधकामांवर कायदेशीर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे....पंचवीस वर्षांपूर्वी नदीपात्र मोकळे होते. तेथे शेत जमीन होती़ त्यावेळी जरी पूर आला तरी नागरीवस्तीला बाधा पोहचत नव्हती़ परंतु नंतरच्या कालखंडात मात्र नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले. त्यामुळे नद्यांना थोडा जरी पूर आला तरी नदीकाठचा नागरीवस्तीचा भाग पूरग्रस्त होतो. २प्रशासन यंत्रणा नेहमीप्रमाणे त्या वेळी तात्पुरती उपाययोजना करते. परंतु कायमस्वरूपी यावर आजपर्यंत तोडगा काढला गेला नाही. शहरातून एकेकाळी दोनशे अडीचशेहून अधिक ओढे-नाले होते. ओढे-नाले बुजवून त्यांच्यावर अतिक्रमण करून बांधकामे झाली आहेत.3 नाल्यांचेही काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरतच नाही ते सगळे नदीकडे सोडले जात आहे. 

४शहरातून वाहणाºया नदी व नाल्यांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी समवेत संयुक्तपणे एक दिवसीय चर्चासत्राची मागणी केली होती. पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांसाठी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यास तज्ज्ञ प्रकल्प सल्लागार एचसीपी या डिझाईन प्लनिंग अँड मॅनेजमेंट अहमदाबाद यांची जून २०१८ मध्ये नेमणूक केली आहे. त्यांनी नद्यांची पाहणी करून कन्सेप्ट मास्टर प्लॉन तयार केला आहे. ४पर्यावरण विभागाच्या ना हरकत मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, उपाययोजनांचा समावेश या प्रकल्पात आहे. चर्चासत्र आयोजित केले जाईल, असे आयुक्तांनी महापौर जाधव आणि राष्टÑवादीचे कलाटे यांना ६ आॅगस्ट २०१९ ला कळविले होते. त्यानंतर वॉटर आॅडिट आणि चर्चासत्र अजूनही झाले नसल्याचा आरोप राष्टÑवादी काँग्रेसने केला आहे.

महापौरांच्या पत्रावर नाही कार्यवाही ४पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणावर कारवाई आणि मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात़ याबाबत महापौर राहुल जाधव आणि राष्टÑवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. नदी प्रदूषण आणि नद्यांच्या विषयांवर सविस्तर चर्चा करावी. तसेच नद्यांचे वॉटर आॅडिट करावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. .....नदी प्रदूषित होऊन जीवसृष्टी धोक्यात आली आहे. वॉटर आॅडिट आणि चर्चासत्राबाबत अजूनही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. आयुक्तांना शहराच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नाही. चारवेळा मागणी करूनही नदीप्रदूषणाबाबत प्रशासन असंवेदनशील असल्याचे दिसते. - मयूर कलाटे 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदी