शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या तोडीस तोड गणेशोत्सव साजरा करू; पोलिसांनी मंडळांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 21:57 IST

पिंपरी -चिंचवड परिमंडळ एकच्या हद्दीतील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भोसरी येथे मंगळवारी बैठक झाली.

पिंपरी : अनेक कार्यकर्ते गणेशोत्सवात व्यवस्थापनाचे धडे घेतात. त्यातून ते आयुष्यात चांगले काम करतात. नियोजन, सुरक्षा, सामाजिक उपक्रम अशा विविध चांगल्या बाबतीत पुणे शहराच्या तोडीस तोड पिंपरी -चिंचवड शहरात गणेशोत्सव साजरा करू, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

पिंपरी -चिंचवड परिमंडळ एकच्या हद्दीतील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भोसरी येथे मंगळवारी बैठक झाली. यावेळी पोलीस आयुक्त शिंदे बोलत होते. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, प्रेरणा कट्टे, परिमंडळ एकमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी पोलिसांसमोर मांडल्या. त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. वाहतूक समस्या, विजतारांची समस्या, गणेशोत्सव परवान्याची समस्या आदींबाबत चर्चा झाली. पोलीस आयुक्तांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, परिमंडळ एकच्या हद्दीत एक लाख वीस हजार घरगुती तर सुमारे एक हजार सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे. मंडळांनी शंभर लोकांमागे किमान १० स्वयंसेवक ठेवावेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. वाहतुकीस अडथळा येणार नाही, आवाजामुळे त्रास होणार नाही, अशा प्रकारचे मंडळांनी नियोजन करावे.   

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, गणेशोत्सवात डीजेचा वापर करू नये. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून त्याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. वर्गणीसाठी जबरदस्ती केल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातील.      

पुण्याच्या धर्तीवर पिंपरी- चिंचवडमध्ये ‘मोरया न्यास’

पुणे शहरात विघ्नहर्ता न्यासच्या माध्यमातून मंडळांना पुरस्कार दिला जातो. त्याच धर्तीवर पिंपरी -चिंचवड शहरात देखील असा उपक्रम राबविला जाणार आहे. मोरया न्यासच्या माध्यमातून यावर्षीपासून शहरातील सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांचा पोलिसांतर्फे सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंडळ, सुरक्षा कमिटी सदस्यांची एक समिती नेमण्यात येईल. त्याचे पोलिसांकडून नियोजन सुरू आहे. त्या माध्यमातून उत्कृष्ट मंडळांना पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPuneपुणे