शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडच्या गुंडांची फलटणमध्ये हत्या, वाकड पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 15:04 IST

सराईत गुन्हेगार सचिन शेटे उर्फ ठाकूर याची फलटण (सातारा) येथे डोक्यात दगड घालून अज्ञातांनी हत्या केली आहे.

पिंपरी- सराईत गुन्हेगार सचिन शेटे उर्फ ठाकूर याची फलटण (सातारा) येथे डोक्यात दगड घालून अज्ञातांनी हत्या केली आहे. हत्या झालेली व्यकती ही सराईत गुन्हेगार असल्याचे वाकड पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आलं. या प्रकरणातील एका संशयिताला वाकड पोलिसांनी अटक केली असून सुशील शिंदे असं त्याचं नाव आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथे आढळून आलेला मृतदेह सचिन शेटे या सराईत गुन्हेगाराचा असल्याचे निष्पन्न झालं.

वाकड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात त्यास अटक झाली होती. पण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर विविध ठिकाणी दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, दहशत माजविणे, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे १३ गंभीर गुन्हे त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआगोदरच केले वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याने एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यातून तो जामिनावर बाहेर आला होता. दरम्यानच्या काळात त्याचा खून झाला आहे.  

या प्रकरणी काळेवाडी येथून सुशील शिंदे या संशयिताला वाकड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेली मोटारही पोलिसांनी जप्त केली आहे. फलटण येथे सचिन शेटे या सराईत गुन्हेगाराला मारून टाकण्यात आले. पिंपरी चिंचवड येथून फलटणला जे लोक गेले. त्यांच्याबरोबर वाहन चालविण्यासाठी गेल्याचे सुशिल शिंदे याने वाकड पोलिसांना सांगितले. केवळ वाहन चालविण्यासाठी गेलो. सातारा येथे त्यांना सोडले, पुन्हा दुसऱ्या वाहनाने परतलो. फलटणमध्ये काय झाले? शेटे याला कोणी मारले? याबद्दल काही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. पुढील तपासासाठी वाकड पोलिसांनी शिंदे याला फलटण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.