शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडकरांनी अनधिकृतची चिंता करू नये - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 01:23 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला. न्यायालयाने काल जो निर्णय दिला तो आरक्षित जागेवरील अतिक्रमणासाठी होता. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी चिंता करू नये, न्यायालयाच्या आधारानेच बांधकामे नियमित होणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला. न्यायालयाने काल जो निर्णय दिला तो आरक्षित जागेवरील अतिक्रमणासाठी होता. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी चिंता करू नये, न्यायालयाच्या आधारानेच बांधकामे नियमित होणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने अटल संकल्प महासंमेलन निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी झाले. लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासंमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार बाळा भेगडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार बाबूराव पाचर्णे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड आदी उपस्थित होते. पक्षनेते एकनाथ पवार यांनी स्वागत केले. महापौर राहुल जाधव यांनी आभार मानले.शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळायला हवा, असा दावा आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला.‘‘आम्ही भाजपा सोडणार या आवई उठविल्या जात आहेत. मी आणि भाऊ आम्ही तात्पुरते भाजपात आहेत, असा अपप्रचार केला जात आहे.बदनामी करण्याचे राजकारण करू नका, गाठ पैलवानाशी आहे. माझ्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत. वेळ पडल्यास बाहेर काढू, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला.अटल कार्यकर्ता संमेलनातील गर्दीने मदनलाल धिंग्रा मैदान खचाखच भरले होेत. संमेलनात सुरुवात होताच ‘संमेलनाच्या फलकाला फुगे बांधलेले होते. पाहुण्यांनी हे फुगे हवेत सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळ ते फुगे हवेत उडालेच नाहीत.न्यायालयाचा निर्णय हा आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांसंदर्भातील मुंबईची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार? याबाबत उत्सुकता होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम धारकांनी चिंता करू नये. न्यायालयाकडून काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सरकारनेदक्षता घेतली होती. कालचा न्यायालयाचा निर्णय हा आरक्षितजागेवरील बांधकामांविषयी होता. आरक्षणाच्या जागेवरील बांधकामे नियमित करताना जागा देणे आवश्यक आहे. पिंपरीतील बांधकामे नियमित होणार आहेत.’’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड