शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटाने ग्रासलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना कर माफीचा दिलासा मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 11:42 IST

कोरोना काळातील कर माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पडून आहे. 

ठळक मुद्देआजपर्यंत ऐंशी हजारांहून नागरिकांना कोरोनाची बाधा,१३०० जणांचा मृत्यू

पिंपरी : कोरोना संकटाने ग्रासलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना मिळकत कर आणि शास्तीकर माफीचा दिलासा मिळणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. सरसकट शास्तीकर माफ करून मुंबईच्या धर्तीवर पाचशे चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांना करमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे. कोरोना काळातील कर माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पडून आहे. 

पिंपरी चिंचवड शहरास कोरोनाचा विळखा पडला आहे. आजपर्यंत ऐंशी हजारांहून नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. १३०० जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे २७ लाख लोकसंख्येच्या शहरात पावणेदोन लाख अनधिकृत बांधकामे आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शहरातील कष्टकरी, कामगार, मजूर, टपरीधारक, माथाडी कामगार, किरकोळ विक्रेते, मध्यमवर्गीय, रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते, सुरक्षारक्षक, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांनी अर्धा, एक आणि दिड गुंठा विकत घेऊन त्यावर घरे बांधली आहेत. त्यांच्याकडून शास्तीकर घेतला जातो. परंतु, गेल्या सहा महिन्यांत अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येकांना नोकरी गमवावी लागली आहे. आर्थिक संकटाने सामान्य नागरिकांनी चहूबाजूंनी घेरले आहे. कोरोना काळात कर माफीची मागणी होत आहे.

...........कर माफी कागदावरसामान्य नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सरसकट शास्तीकर माफीचा प्रस्ताव दहा जानेवारीला रोजी मंजूर केला आहे. तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. परंतु, त्यास सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या डोक्यावर शास्तीकराची टांगती तलवार कायम आहे.  

........ 

सामान्यांना दिलासा हवाकोरोना कालखंडात  नागरिक आर्थिक विवंचनेत आहेत. घऱखर्च, शिक्षण, आरोग्य यावरील खर्चाने प्रत्येकाचे बजेच कोलमडले आहे. त्यात शास्तीकराचे ओझे न झेपणारे आहे. पिंपरी-चिंचवडकर हवालदिल आहेत. पालिकेचा ठराव मान्य करण्याची तत्परता राज्य सरकारने दाखविल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले. ..... सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, कोरोना कालखंडात मिळकत कर माफी द्यावी, असा ठराव राज्य शासनास पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनातर्फे कारवाई करता येईल.'

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याTaxकरState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार