शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा! ऋषिकेश अरणकल्लेंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

By रोशन मोरे | Updated: September 1, 2023 15:53 IST

नुकताच बालेवाडी क्रीडा नगरी येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला...

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहर पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल ऋषिकेश गजानन अरणकल्ले यांना सन २०२०-२१ या वर्षीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मल्लखांब या क्रीडा प्रकारात त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. नुकताच बालेवाडी क्रीडा नगरी येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

ऋषिकेश अरणकल्ले हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात नेमणुकीस आहेत. अरणकल्ले हे मुळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेत झाले. तिथे त्यांना मल्लखांब खेळण्याची आवड लागली. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पुणे शहरात गेले. तिथे त्यांनी उत्तम प्रकारे सराव केला. दरम्यान, जिल्हा, राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली.

ऋषिकेश हे सन २०१४ साली मल्लखांब या खेळ कोट्यातून सातारा पोलीस दलात रुजू झाले.सातारा पोलीस दलात चार वर्ष काम केल्यानंतर सन २०१८ साली त्यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली. त्यानंतर पुढील चार वर्ष त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस दलाकडून राष्ट्रीय स्पर्धांना गवसणी घातली. सन २०१८ मध्ये फोंडा गोवा येथे झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक आणि टांगता मल्लखांब प्रकारात देखील सुवर्ण पदक पटकावले. ऋषिकेश अरणकल्ले यांना सन २०२१ चा मल्लखांब या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अरणकल्ले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.राष्ट्रीय पातळीवर यश-

सातारा पोलिस दलात असताना त्यांनी सन २०१७ साली मध्य प्रदेश मधील उज्जैन येथे झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक तसेच पोल मल्लखांब प्रकारात कांस्य पदक मिळवले. सन २०२२ मध्ये उज्जैन येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक मिळवले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस