शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

आयुक्तालय जागानिश्चितीला वेग, मुंबई येथील बैठकीत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:29 IST

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर जागा घेऊन पोलीस आयुक्तालय सुरू करायचे आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर जागा घेऊन पोलीस आयुक्तालय सुरू करायचे आहे. शहरात १२ इमारती आणि ६ मोकळ्या जागा आहेत. त्यातून जागा निश्चित करण्यासाठी कामाचा वेग वाढवा, त्यानंतर मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होईल, असा आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत पुणे शहर पोलीस अधिकाऱ्यांना दिले.महाराष्टÑदिनी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचे सूतोवाच होते. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील शाळा इमारत आयुक्तालयासाठी देण्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र नागरिकांनी शाळा इमारत देण्यास विरोध केला. त्यामुळे ही जागा निश्चित होऊ शकली नाही. पोलीस आयुक्तालय सुरू होण्याचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त टळला. या प्रकाराला ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे वाचा फोडली होती. ‘आयुक्तालयाच्या घोषणेचा फज्जा’ असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. दरम्यान, पोलीस महासंचालक आणि पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्याशिवाय पोलीस आयुक्तालय सुरू होण्याच्या हालचालींना वेग येणार नाही, असे मत ‘लोकमत’शी बोलताना विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोºहे यांनी व्यक्त केले होते.  शासन स्तरावर मंजुरी मिळाल्यानंतरही पोलीस प्रशासनाची, तसेच जागा देण्याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत असल्याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली होती. पोलीस आयुक्तालय सुरू होण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा चर्चेत येताच पोलीस महासंचालक माथूर यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील, तसेच पिंपरी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची मुंबईला तातडीची बैठक बोलावली.आयुक्तालयासाठी तात्पुरती व्यवस्थातात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तालय सुरू करायचे आहे,नंतर शासन स्तरावर उपलब्धहोणाºया जागेवर कायमस्वरूपी पोलीस आयुक्तालय स्थलांतरित होणार आहे. परिमंडल तीनचेपोलीस उपायुक्त शिंदे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यामार्फत यापूर्वीच पोलीस आयुक्तालयाच्या जागांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. प्र्रेमलोक पार्क, निगडीतील शाळा इमारत, मोशीतील प्राधिकरणाची जागा, एचए कंपनीचा भूखंड, ताथवडे येथील जागा, प्राधिकरण कार्यालय, गायरान जागा आदी ठिकाणी जागा आहेत. तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय सुरू करण्यात येणार असल्याने यापैकी सोईस्कर ठरणारी जागा निश्चित करा.आयुक्त कार्यालय, अप्पर आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त या कार्यालयांसाठी पुण्याप्रमाणे एकाच ठिकाणी जागेची निवड करता येईल, असे सांगून जागा निश्चित होताच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने होऊ शकेल, असा विश्वास पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी बैठकीत व्यक्त केला.शहरातील १२ इमारती, ६ मोकळ्या भूखंडांचा पर्याय- महासंचालकांनी मुंबईत बैठक आयोजित केली असल्याने तत्पूर्वी शनिवारी नवीन पोलीस आयुक्तालय नियोजन व समन्वय विभागाचे अप्पर महासंचालक रितेश कुमार यांनी पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड शहरातील जागांची पाहणी केली. अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, तसेच परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यात नेमकी कोणती जागा निश्चित केली जावी, या मुद्द्यावर चर्चाही झाली. शहरातील १२ इमारती आणि सहा मोकळ्या जागांची इत्थंभूत माहिती घेऊन महासंचालकांपुढे सादरीकरण करण्यात आले. बैठकीस अप्पर महासंचालक रीतेश कुमार, पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक, पुणे शहर मुख्यालयाचे उपायुक्त बी. जी. गायकर, पिंपरी विभागाचे उपायुक्त गणेश शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड