पिंपरी - 'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१९- २०या आर्थिक वर्षांचा मूळ ४६२० कोटी तर जेएनएनयूआरएमसह ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीला सादर केला.यंदा मालमत्ता करात कोणतेही करवाढ केली नाही. सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 37 वा अर्थसंकल्प आहे.
‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ६१८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 12:36 IST