शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून ८ जण पडणार बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:42 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ जण बाहेर पडणार असून सत्ताधारी भाजपाने पाच वर्षात पन्नास नगरसेवकांना संधी देण्यासाठी स्थायीतील विद्यमान दहा सदस्यांचे राजीनामे घेण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देस्थायीतील विद्यमान दहा सदस्यांचे राजीनामे घेण्याची भाजपाची तयारीकोण समितीत येणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत उत्सुकता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ जण बाहेर पडणार असून सत्ताधारी भाजपाने पाच वर्षात पन्नास नगरसेवकांना संधी देण्यासाठी स्थायीतील विद्यमान दहा सदस्यांचे राजीनामे घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप महापालिकेत ठाण मांडून बसले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे १६ सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. बुधवारच्या स्थायी सभेत सदस्यांचा 'ड्रॉ' काढण्यात येणार आहे. परंतु, सभा दुपारी दोन वाजता होणार होती. ती अद्याप सुरू झाली नसून स्थायीतील भाजपा नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू आहे. भाजपातील काही सदस्य राजीनामे देण्यास उत्सुक नसल्याचे कळते. त्यामुळेच सभा सव्वादोन नंतरही सुरू झाली नसल्याची चर्चा महापालिका वतुर्ळात सुरू आहे.

कोणाचा होणार पत्ता कट?, उत्सुकता शिगेला भाजपातर्फे दहा सदस्यांना संधी स्थायी समितीमध्ये अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवाणी (भाजपा), राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे सदस्य आहेत. त्यापैकी आठ जणांची चिठ्ठी निघेल. त्यानंतर नवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या महासभेत निवड केली जाणार आहे. सत्ताधारी भाजपाने स्थायी समितीत पाच वर्षांत दरवर्षी दहा याप्रमाणे पन्नास नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाकडून विद्यमान दहा सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा द्यायला लावून नवीन दहा सदस्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे कोण समितीत येणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा