शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका विधवा आणि घटस्फोटीत महिलांना करणार सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 14:05 IST

कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना मदत..

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला वर्गाला सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महापालिकेमार्फत  विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जातात.शहरातील विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना मदत करण्यात येणार आहे.कशी होईल मदत

पूर्वी या योजनेद्वारे विधवा आणि घटस्फोटीत महिलांना १० हजार रुपये इतकी रक्कम  अर्थसहाय्य म्हणून देण्यात येत होती. या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे.  विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाºया अर्थसहाय्यामध्ये आता वाढ केली आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाºया कौशल्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण  पूर्ण केलेल्या शहरातील  महिलांना २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.  तर असे प्रशिक्षण न घेतलेल्या महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जाईल.

कोणती हवीत कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी अर्जदाराला  तहसीलदार यांच्याकडील २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारा दाखला अथवा २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या रेशनकार्डची प्रत अनिवार्य होती परंतु आता यात बदल करण्यात आला असून यासाठी आता तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांचा २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारा दाखला अथवा प्राधान्य घरगुती शिधापत्रिका असणाºया महिलांना  योजनेचा लाभ घेता येणार आहे.

असा करता येईल अर्ज

अर्ज सादर करणाऱ्या विधवा आणि घटस्फोटीत महिलांनी महापालिका हद्दीतील आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. यासोबत मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत, घटस्फोटीता  महिलांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत, विधवा स्त्रीयांना पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची प्रत जोडावी लागेल. तसेच अर्जदार महिलेचे वय अर्ज केलेल्या दिनांकास ५० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. 

महिलांना स्वयंरोजगारासाठी उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी  महापालिकेच्या वतीने  अटलबिहारी वाजपेयी विधवा आणि घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य  योजनेची सुरुवात केली आहे.- राजेश पाटील, आयुक्त

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका