शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
3
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
4
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
5
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
6
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
7
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
8
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
9
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
11
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
12
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
13
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
15
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
17
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
18
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
19
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
20
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 

पिंपरी-चिंचवड महापालिका : जागेसाठी दोनशे सूचना, हरकती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:47 AM

पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज पाहता मध्यावर असणारी एच. ए . कंपनीची जागा घेण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज पाहता मध्यावर असणारी एच. ए . कंपनीची जागा घेण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. जमीन खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. सुमारे दोनशे जणांनी हरकती व सूचना दाखल केल्या आहेत. त्यापैकी एक सूचना कंपनीकडूनही आली आहे. या जागेच्या बदल्यात साडेसातशे कोटी मिळावेत, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.उद्योगनगरीची पायाभरणी केंद्र सरकारच्या वतीने पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली. पुणे-मुंबई राष्टÑीय महामार्गावर पिंपरीत महामार्गाच्या दोन्ही बाजूस हा कारखाना आहे. पेनिसिलिनची निर्मिती या ठिकाणी होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एच. ए़ कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. उत्पादन थांबल्याने कामगारांना वेतन देण्यातही अडचणी येत आहेत. कंपनीला संकटातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने मालकीची जमीन खुल्या बाजारात विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. त्यानुसार जमीन विकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जागा विक्री करण्यासंदर्भात नोटीस प्रसिद्ध केली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंपनीकडील जमीन खरेदी करण्यास महापालिकेने उत्सुकता दर्शविली आहे.भविष्यात शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज पाहता महापालिकेनेच ही जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे विस्तारित कार्यालय, अन्य व्यावसायिक उपयोगितेसाठीया जागेचा वापर करण्याचे नियोजन केले होते़ ही दूरदृष्टी ठेवून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्ताव तयार केला होता.असे आहे क्षेत्रकेंद्र शासनाच्या अंगीकृत असणाºया हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड कंपनीची जागा पिंपरी ते नेहरुनगर रस्त्यावर आहे. कंपनीच्या ताब्यात हे क्षेत्र असून ताब्यातील पिंपरी येथे सर्व्हे नं. एकशे एक ते सहा आणि १६८, १६९ पैकी (सिटी सर्व्हे क्रमांक ६२५४, ५२०० पैकी) मधील कंपनीच्या ताब्यातील अतिरिक्त ६६ एकर जमीन खुल्या बाजारात विक्रीस काढली आहे. त्यापैकी अतिरिक्त ५९ एकर जमीन कंपनीला विक्री करण्यास राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, ५९ एकर क्षेत्राची जमीन विकास योजनेत निवासी विभागात समाविष्ट केली जाणार आहे. या भूखंडास महापालिकेने ताब्यात घेऊन ते विकसित करण्याचे काम करण्यात येणार आहे.बहुउद्देशीयसाठी विकसित करणारमहापालिकेने कंपनीच्या ५९ एकर जमीन आरक्षणाचा प्रस्ताव तयार केला होता. एचएची जागा मंजूर विकास योजनेत बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित केल्यास नागरिकांना विविध सोयी- सुविधा पुरविणे शक्य होणार आहे, असे प्रस्तावात नमूद केले होते. त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिली होती. जमीन खरेदीपोटी आवश्यक रक्कम म्हणजेच १ हजार कोटी रुपये तातडीने जमा करावी, अशी सूचना केंद्राने केली होती. बाजारभावापेक्षा एच.ए़ चा दर जास्त आहे. पालिकेला जागेची आवश्यकता आहे. एच.ए़ कंपनीचे देखील नुकसान होऊ नये, ही भूमिका महापालिकेची आहे. तसेच जागा घेण्याबाबत राज्य सरकारचा सल्ला घेण्यात येईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड