शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका खरेदी करणार ५५ लाखांचे रुमाल..! फाईली, कागदपत्रांचे गठे बांधण्यासाठी वापरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:14 IST

- कामकाजाच्या फाईली आणि कागदपत्रांचे गठ्ठे बांधण्यासाठी वापरणार : पेपरलेस कामकाज कधी सुरू करणार?

पिंपरी : महापालिका प्रशासन एक-दोन हजार नव्हे तर, तब्बल ५० हजार लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या अशा रंगीबेरंगी रुमालांची खरेदी करणार आहे. त्यासाठी तब्बल ५५ लाख १२ हजार ५०० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हे रुमाल महापालिका कामकाजाच्या फाईली आणि कागदपत्रांचे गठ्ठे बांधण्यासाठी वापरले जाणार आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत पेपरलेस कामकाज सुरू करणार असल्याचे महापालिका प्रशासन अनेक वर्षांपासून ओरडून सांगत आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी काही होताना दिसत नाही. त्याचा मुहूर्त लागत नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलांवरील फाईलींचे ढीग कमी होताना दिसत नाहीत. टेबलावर जास्त फाईलींचा ढीग म्हणजे अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण, असा गैरसमज महापालिका वर्तुळात आहे.शेकडो फाईली कशा ओळखायच्या यासाठी विविध रंगांच्या रूमालांमध्ये त्या गुंडाळून ठेवल्या जातात. अधिक महत्त्वाची, मध्यम महत्त्वाची, नियमित, कमी महत्त्वाची फाईल, त्या त्या रंगांच्या रूमालात बांधून ठेवली जाते. ती महापालिकेची जुनी परंपरा आहे. त्यात अद्याप खंड पडलेला नाही. महापालिकेच्या विविध विभागांच्या फाईली व कागदपत्रांचे गठ्ठे बांधण्यासाठी लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या रूमालांचा वापर केला जातो.फाईलींचा ढीग मोठा प्रमाणात असल्याने त्यासाठी तब्बल ५० हजार रुमालांची आवश्यकता आहे. प्रत्येक रंगाचे दहा हजार रुमाल खरेदी करण्यात येत आहेत. एका रुमालाची किंमत ११० रुपये २५ पैसे आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता थेट महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून ते खरेदी करण्यात येणार आहेत. ही खरेदी मध्यवर्ती भांडार विभागाकडून करण्यात येत आहे. खरेदीनंतर हे रूमाल सर्व विभागांना वितरित केले जातील. या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिका