शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर!

By विश्वास मोरे | Updated: February 20, 2024 09:08 IST

पिंपरीकरांना खुश करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात काय योजना असणार, याविषयी उत्सुकता

पिंपरी: महापालिकेत प्रशासकीय राजवट लागून दोन वर्षे झाली आहेत. प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प मंगळवारी सकाळी ११ वाजता सादर होणार आहे. प्रशासक आणि शेखर सिंह यांच्या कारकिर्दीतील दुसरा अर्थसंकल्पातून त्यात नक्की दडलय काय? याची उत्सुकता शहरवासीयांना आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. लेखा विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प हा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. त्यानंतर प्रशासक अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये सांगतील. 

निवडणुकांचे वर्ष, सवलती विषयी उत्सुकता

पुढील वर्षभर लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका आहेत. त्यामुळे शहरवासीयांना खुश करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात काय योजना आहेत.  याविषयी उत्सुकता आहे. मिळकत कर आणि पाणीपट्टी दरवाढ होणार नाही, हे आयुक्तांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र कर सवलत याविषयीची उत्सुकता आहे. लोकनियुक्त समिती नसल्याने नव्या योजना काय? उत्पन्न  स्रोत वाढीवर उपाययोजना काय? याविषयी उत्सुकता आहे. सुमारे ७१८कोटी शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. यंदा शिलकीचा असेल की वाढीचा असेल? याविषयी उत्सुकता वाढली आहे.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प 2024MONEYपैसाInflationमहागाई