शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीच्या पाच जागांवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 14:58 IST

भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या होत्या.

ठळक मुद्देमहापौर नितीन काळजे यांची नियुक्तीची घोषणा

पिंपरी चिंचवड:  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोलस, अर्चना बारणे आणि साधना मळेकर या चार आणि अपक्ष साधना मळेकर यांची मंगळवारी निवड करण्यात आली. महापौर नितीन काळजे यांनी स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा केली. भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या होत्या. महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीतील सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ असतो. परंतु, सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील आठ सदस्य पहिल्या वषार्नंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढून निश्चित केली जातात. चिठ्ठीद्वारे भाजपचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती देखील झाली आहे. चिठ्ठीतून वाचलेले भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच भाजपसोबत असलेले अपक्षांचे गटनेते कैलास बारणे स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून कायम राहिले होते. परंतु, स्थायी समितीत पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी 'ड्रॉ' काढण्याच्या अगोदरच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या दहा आणि अपक्ष एक अशा ११ नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे घेतले होते. स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये. यासाठी भाजपने चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. त्यामुळे पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी घेतलेले चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती नगरसेवकांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी मंजूर केले होते. त्यामुळे स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागांवर यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिले. त्यानंतर  संबंधितांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर काळजे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv Senaशिवसेना