शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

सांगवीत अनधिकृत बांधकामावर पिंपरी चिंचवड महापालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:45 IST

प्रभाग क्रमांक ३२ सांगवी मधूबन कॉलनी गल्ली क्रमांक १० येथील नव्याने सुरु असलेल्या एका पाच मजली आरसीसी ३५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

ठळक मुद्देसांगवी येथील मधूबन कॉलनी येथील १० हजार चौरस फुटाचे पाडण्यात आले अनधिकृत बांधकाम अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठेवण्यात आली मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज

रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग व ह प्रभाग यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२ सांगवी मधूबन कॉलनी गल्ली क्रमांक १० येथील नव्याने सुरु असलेल्या एका पाच मजली आरसीसी ३५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम असलेल्या इमारतीतील गुरुवारी सुमारे १० हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडण्यात आले. उर्वरित बांधकाम पाडण्याचे काम सुरू ठेवणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.काही काळ थंडावलेली पालिकेची अनधिकृत बांधकामावरील कारवाई पुन्हा एकदा जोमात सुरु झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिक धावाधाव करीत आहेत तर दुसरीकडे कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. सांगवी येथील मधूबन कॉलनी येथे अनधिकृत नव्याने सुरू असलेली ३५ चौरस फुटाची पार्किंग व चार मजली इमारत आहे. त्यातील आज १० हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. उर्वरित बांधकाम पाडण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे पालिकेच्या संबधित विभागाने सांगितले आहे ही कारवाई  करत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पोलिसा बरोबरच सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अचानक सुरु झालेल्या कारवाईमुळे नागरिक भयभीत झाले. ही कारवाई कार्यकारी अभियंता मनोज शेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग व ह यांच्या पथकानी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड