शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: बिगुल वाजले...! ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी रणधुमाळी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:49 IST

- एकूण मतदार १७ लाख १३ हजार ८९१; चार सदस्यीय प्रभाग रचना; २०४४ मतदान केंद्रे निश्चित; आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल सोमवारी (दि. १५) वाजले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, सुमारे पावणे नऊ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळीही चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे. एकूण ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठी ही निवडणूक आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेची मागील निवडणूक २१ फेब्रुवारी २०१७ रोजी झाली होती. सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली आहे. आता निवडणूक जाहीर झाली असून, बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक राबविली जाणार आहे. चार सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. प्रत्येक उमेदवारासाठी १३ लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार असणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात एकूण मतदारांची संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ५ हजार ७२८, तर स्त्री मतदार ८ लाख ७ हजार ९६६ आहेत. इतर मतदारांची संख्या १९७ आहे. निवडणुकीसाठी २०४४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये...प्रभाग १०, १४, १५ व १९ : स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी

प्रभाग १६, १७, १८ व २२ : ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगावप्रभाग २, ६, ८ व ९ : क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, एमआयडीसी, भोसरी

प्रभाग २५, २६, २८ व २९ : ड क्षेत्रीय कार्यालय, औंध-रावेत बीआरटी रोड, रहाटणीप्रभाग ३, ४, ५ व ७ : कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी

प्रभाग १, ११, १२ व १३ : सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाऊन हॉलप्रभाग २१, २३, २४ व २७ : ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव

प्रभाग २०, ३०, ३१ व ३२ : पिंपरी-चिंचवड बॅडमिंटन हॉल, पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी

अंतिम मतदार यादी येथे होणार उपलब्धमहापालिका मतदार यादी कक्ष : निवडणूक मतदार यादी कक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पहिला मजला, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी

अ क्षेत्रीय कार्यालय : भेळ चौक, निगडी प्राधिकरण, निगडी

ब क्षेत्रीय कार्यालय : पिंपरी चिंचवड लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव

क क्षेत्रीय कार्यालय : नेहरूनगर, पॉलिग्रास ग्राउंडजवळ, एमआयडीसी, भोसरी

ड क्षेत्रीय कार्यालय : औंध-रावेत रोड, रहाटणी

इ क्षेत्रीय कार्यालय : ग्रोथलॅब इमारत, पांजरपोळ समोर, पुणे-नाशिक रोड, भोसरीफ क्षेत्रीय कार्यालय : नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडीग क्षेत्रीय कार्यालय : तिसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मागे, थेरगावह क्षेत्रीय कार्यालय : मुलींचे आयटीआय प्रशिक्षण केंद्र, कासारवाडी

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Municipal Elections Announced: Battle for 128 Seats Begins!

Web Summary : Pimpri-Chinchwad Municipal Corporation elections announced after nine years, with voting on January 15th. 128 seats across 32 wards are up for grabs. Multi-member ward system, expenditure limit of ₹13 lakhs per candidate. Total 17.13 lakh voters will exercise their right.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६