शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका | कंत्राटी कामगारांच्या पगारावर ठेकेदारांचा डल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:25 IST

घनकचरा नव्हे, ‘धन''कचरा’...

पिंपरी : ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची माहिती देण्यासाठी महापालिकेने ठेकेदारांकडे काम सोपविले आहे. मात्र, ठेकेदाराने दोन महिने झाले कंत्राटी कामगारांचा पगारच दिला नाही. पगार मागितला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे स्मार्ट सिटीचा डौल मिरविणारी महापालिका आणि संबंधित ठेकेदारांकडे काम करणारे कामगार पगाराविना असल्याचे वास्तवसमोर आले आहे.

डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस नावाच्या कंपनीला कचऱ्यांचे विलगीकरण करण्याची माहिती देण्याचे काम दिले आहे. ही कंपनी इंदौरची आहे. यांचे कर्मचारी घरोघरी जाऊन कचऱ्याच्या विलगीकरणाविषयी माहिती देतात. त्यासाठी त्यांचा पगारही ठरलेला आहे. मात्र, दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही. पगाराविषयी विचारले असता कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत असल्याचे संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्याने ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले.

घनकचरा नव्हे, ‘धन''कचरा’शहराच्या घनकचरा व्यवस्थापनात कंत्राटदार संस्था किंवा कंपनीला मोठा नफा मिळत आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करीत कचऱ्याचे विलगीकरण करण्याची माहिती घरोघरी जाऊन देण्यासाठी ‘स्वस्तातील’ कामगार मिळवून ते काम करवून घेतात. त्यात कंत्राटदार, अधिकारी यांचा मोठा आर्थिक लाभ होतो. परंतु, मोबदल्यात त्या कामगारांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. तरी, याविषयी महापालिका संबंधित कंत्राटदारांना एका शब्दाने जाब विचारत नाहीत. यातून कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे संबंधित कर्मचारी व कामगारांचे म्हणणे आहे.

महापालिका अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष...कंत्राटदार वर्षानुवर्षे महापालिकेला वेगवेगळ्या सेवा पुरवितात. मात्र, पालिकेकडून यापैकी कोणत्याच कंत्राटदाराला वेळेत बिले दिली जात नाहीत. अनेकदा कमिशन मागितले जाते. त्यामुळे स्वाभाविकच कंत्राटदार ज्यांना आपल्या सेवेत घेतो, त्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार, इतर सुविधा देऊ शकत नाही. यात सर्वांत मोठी परवड होते ती कामगारांची. महापालिका अधिकारी म्हणतात, ‘ठेकेदार अन् तुम्ही बघून घ्यावे,''''. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा महापालिकेशी काडीमात्र संबंध नाही. ते कर्मचारी ठेकेदारांनी लावलेले असून, त्यांचा पगारही ठेकेदार करीत आहेत, अशी भूमिका घेत महापालिका अधिकारी कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.एक महिन्याचा कर्मचाऱ्यांचा पगार बाकी आहे. काहींचे जॉईंनिग लेटरही बाकी आहेेत. ज्यांनी मागणी केली आहे. त्यांना जॉईंनिग लेटर देण्यात येत आहेत.- आकाश परदेशी, व्यवस्थापक, डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड