शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजेच जुन्याच प्रकल्पांना मुलामा : विरोधकांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:10 IST

श्रीमंत महापालिका असतानादेखील भाजपच्या राजवटीत कर्जरोखे उभारावे लागत असून ही शोकांतिका

ठळक मुद्देपाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्यासाठी भरीव तरतूद सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

पिंपरी : महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर महापालिकेतील गटनेत्यांनी टीका केली आहे. अर्थसंकल्पामध्ये कोणतेही नावीन्यपूर्ण प्रकल्प नाहीत. जुन्याच प्रकल्पाला नव्याने मुलामा दिला आहे. कर्जरोखे उभारून महापालिकेला कर्जबाजारी केले जाणार आहे, अशी टीका विरोधी पक्षातील गटनेत्यांनी केली. तर पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्यासाठी भरीव तरतूद केली असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीला सादर केला आहे. नवीन स्थापत्यविषयक प्रकल्प राबविण्यापेक्षा आयुक्तांनी राहण्यायोग्य शहर निर्माण करण्यासाठी पाऊल उचलले आहे. तसेच पाणीपुरवठा योजना आणि सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणाचे पाऊल टाकले आहे. यावर विरोधकांनी टीका केली, तर सत्तारूढ नेत्यांनी कौतुक केले आहे.सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महापालिका अर्थसंकल्पात पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षणाला महत्त्व दिले आहे. महत्त्वाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएमएलकरिता तरतूद केली आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना, नदीसुधार योजना यांसारख्या सर्व प्रकल्पांना निधी ठेवला आहे. यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने हा अर्थसंकल्प तयार केला आहे. दिव्यांग कल्याणकारी योजना, शहरी गरिबांसाठी अशा विविध कल्याणकारी योजनांसाठी तरतूद आहे.विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले,  अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण काही नाही. जुन्याच योजनांना मुलामा दिला आहे. नागरिकांवर कराचा बोजा सुचविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातीलच प्रकल्प अद्यापही पूर्ण करता आले नाहीत. श्रीमंत महापालिका असतानादेखील भाजपच्या राजवटीत कर्जरोखे उभारावे लागत असून ही शोकांतिका आहे. बजेट देताना सत्ताधारी भाजप आणि आयुक्तांनी पक्षपात केला आहे. स्मार्ट प्रभागासाठी आवश्यक तरतूददेखील केली नाही.ह्णह्णमनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले,ह्यह्यशहरातील नागरिकांना काय पाहिजे याचा प्रशासन आणि सत्ताधारी भाजपने अभ्यास करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या मालमत्तांचा कर वाढविण्यात येणार असून हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. ह्णह्णशिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले,ह्यह्यमूलभूत गरज असलेल्या पाणीपुरवठ्याकडे गांभीयार्ने पाहिले पाहिजे हे मान्य आहे. परंतु, कर्ज काढून नको. पाणीपुरवठ्यासाठी चारशे कोंटीचे कर्जरोखे उभारण्यापेक्षा नवीन महापालिका इमारत, यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेला विलंब झाला तरी, कोणताही फरक पडणार नाही. त्याच्या निविदा नंतर काढला येतील. त्याबाबत घाई करण्याची आवश्यकता नाही. शिक्षण, आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे.ह्णह्ण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरBudgetअर्थसंकल्प