शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड : गांधीनगरमध्ये गुंडगिरीचा धुडगूस, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 18:25 IST

ऐन गणेशोत्सवाच्या काळात गांधीनगर कामगार भवनाजवळ मंगळवारी रात्री दोन टोळक्यांनी गुंडगिरी, दादागिरीचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झालेल्या भांडणात आम्हीच या भागाचे ‘दादा’ आहोत, कोणी मध्ये येऊ नये, असा आरडाओरडा करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन टोळक्यांमुळे रहिवाशांनी घाबरुन अक्षरश: घराचे दरवाजे बंद करून घेतले.

पिंपरी चिंचवड, दि. 31 -  ऐन गणेशोत्सवाच्या काळात गांधीनगर कामगार भवनाजवळ मंगळवारी रात्री दोन टोळक्यांनी गुंडगिरी, दादागिरीचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झालेल्या भांडणात आम्हीच या भागाचे ‘दादा’ आहोत, कोणी मध्ये येऊ नये, असा आरडाओरडा करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन टोळक्यांमुळे रहिवाशांनी घाबरुन अक्षरश: घराचे दरवाजे बंद करून घेतले. दोन्ही टोळक्यांनी पोलिसांकडे परस्परविरूद्ध तक्रारी दिल्या आहेत.पोलिसांकडे दाखल असलेल्या माहितीनुसार राहुल भिसे (वय २२,रा.गांधीनगर) याने सहा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यात दिनेश शिंगाडे (वय २५) सुनील तेलकर (वय २५), किरण गुरखा (वय २५),सुरेश धोत्रे (वय २४), आकाश बाबावले (वय १९,सर्व रा.खराळवाडी) आणि एक अल्पवयीन मुलगा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

फिर्यादीत दिल्यानुसार फिर्यादीचा भाऊ संजय भिसे  यास दिनेश शिंगाडे मारहाण करीत होता. फिर्यादी सोडविण्यास गेला त्यावेळी शिंगाडे याने फिर्यादीच्या डोक्यात आणि संजय भिसे याच्या तोंडावर सिमेंट ब्लॉक मारले. त्यांना जखमी केले. भांडण सोडवण्यास आलेल्या काल्या बोचकुरे यास सुनील तेलकर, किरण गुरखा, सुरेश धोत्रे, आकाश बाबावले यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यांना जखमी केले. आम्हीच या भागातील दादा आहोत, मध्ये कोणी पडू नये, त्यांच्याकडू बघून घेऊ असे धमकावत होते.त्यांच्या दहशतीला घाबरून नागरिक सैरभर पळून गेले. घराचे दरवाजे बंद केले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर सुरेश धोत्रे याने चार जणांविरूद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. राहुल सुर्वे (वय २१,रा.गांधीनगर), सुरेश बोचकुरे (वय २३), संजय भिसे (वय २५), राहुल भिसे (वय २२) या आरोपींविरोधात त्याची फिर्याद आहे. त्याच्या फिर्यादीनुसार मित्र आकाश विजय बाबावले लघुशंकेसाठी जात होता. त्यावेळी या आरोपींनी त्यास मारहाण केली असता, फिर्यादी त्या ठिकाणी गेला. संजय भिसे याने फिर्यादी व आकाशच्या डोक्यात पाठीमागून दगड मारला. त्यात ते दोघांना जखमी केले. ‘‘जास्त मस्ती आली आहे का? मस्ती उतरवू का, आम्हीच या परिसराचे दादा आहोत ’’असे ओरडून संजय भिसे आकाशला उद्देशून सांगत होता. त्याच्या आरड्याओरड्याने नागरिक तेथून निघूने गेले. त्यांच्या आवाजाने घरातून कोणीही बाहेर पडले नाही.  

टॅग्स :Crimeगुन्हा