शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड पाचवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 20:56 IST

स्मार्ट सिटी आणि स्वच्छता भारत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बिरुदावलीत आणखी एक भर पडली आहे. प्रॉपर्टी कन्सलटंट असलेल्या एका खासगी संस्थेने देशातील जगण्यासाठी सुयोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे.

पिंपरी  -  स्मार्ट सिटी आणि स्वच्छता भारत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बिरुदावलीत आणखी एक भर पडली आहे. प्रॉपर्टी कन्सलटंट असलेल्या एका खासगी संस्थेने देशातील जगण्यासाठी सुयोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवा क्रमांक आला आहे.देशातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. गेल्या ३० वर्षांत येथील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्येमुळे देशातील अनेक शहरे भकास झाली आहेत. हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र, काही शहरांचे नियोजन अतिशय योग्यरित्या झाल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेने देशातील सुनियोजित अशा शहरांची एक स्पर्धा घेतली होती. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवा क्रमांक आला आहे. जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या या स्पर्धेत १० निकष ठेवले होते. त्यात नियोजन, दळणवळण सुविधा, मूलभूत सुविधांचे प्रमाण, दैनंदिन गरजा, विश्रांती व मनोरंजन, स्मार्ट प्रशासन, सुरक्षितता व निर्भयता, नोकरीच्या संधी, पर्यावरण व शाश्वत विकास, बांधकाम क्षेत्राची कामगिरी, भविष्याचा विस्तार, दृष्टिकोन हे निकष ठेवण्यात आले होते.अशीही आहेत, सुयोग्य शहरेया निकषांत पहिल्या पाचमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक लागला आहे. त्यात पालवा, नवी मुंबई, मोहाली पंजाब, महिंद्रा सिटी चेन्नई, पिंपरी-चिंचवड, राजरहट कोलकाता, टेक्नोपार्क त्रिवेंद्रम, मगरपट्टा सिटी पुणे, ग्रेटर नोयडा या शहरांचा समावेश आहे.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यपिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत वेगाने विकसित झालेले शहर आहे. आता या शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही राज्यात पहिला आणि देशात नववा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर सुयोग्य शहराच्या यादीत शहरास पाचवा क्रमांक मिळाला आहे, ही भूषणावह बाब आहे. आपले शहर रहिवाशांसाठी सर्वोत्तम शहर आहे, यावर मोहोर उमटविली आहे.ह्णह्ण

टॅग्स :Governmentसरकार