शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

पिंपरीत संचारबंदीतही वाढली कोरोना रुग्णसंख्या, पण त्या तुलनेत कोरोनमुक्तांचे प्रमाण समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 12:07 PM

शहरात टेस्टिंगची आकडेवारी लाखांच्या घरात

ठळक मुद्देमृत्यूच्या प्रमाणात अजिबात घट नाही, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक

पिंपरी: राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने १५ एप्रिल पासून संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच कडक निर्बंध लावल्यात आले आहेत. संचारबंदीत पिंपरीत कोरोना रुग्णसंख्या वाढली. तरी त्या तुलनेत कोरोनमुक्तांचे प्रमाण समाधानकारक असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र मृत्यू होणाऱ्यांमध्ये अजिबात घट झाली नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

शहरात कडक निर्बंधापूर्वी म्हणजे ३१ मार्च ते १४ एप्रिल या काळात ३५ हजार ४६९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १ लाख १६ हजार ९२१ टेस्ट करण्यात आल्या आहेत. या कालावधीत २९ हजार ७१६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर संचारबंदी नंतर म्हणजे १५ एप्रिल ते १ मे या काळात शहरात ३९ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४० हजार ३०८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या काळात रोज होणाऱ्या टेस्टचे प्रमाण वाढवण्यात आले. एकूण १ लाख ६८ हजार ३०८ टेस्ट या काळात करण्यात आल्या आहेत. या आकडेवारी वरून संचारबंदी नंतर शहरात रुग्णख्येचा आकडा हा चार हजारांनी वाढला असला तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही समाधानाची बाब आहे. तसेच संचार बंदी नंतर रोज सरासरी अकरा हजार टेस्ट होत आहेत. 

शहरात ४ एप्रिल नंतर दैनंदिन रुग्ण संख्येने तीन हजारांचा आकडा पार केलेला नाही. तसेच मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या ही स्थिरावली आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत शहरात बरे होणाऱ्या प्रमाण हे ८७ टक्के आहे. तर पॉझिटिव्हिटी दर हा २२ टक्के आहे. हा मार्च मध्ये ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत गेला होता. परंतु एप्रिल मध्ये मृत्युचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिल 

रुग्ण : ३५ हजार ४६९टेस्ट : १ लाख १६ हजार ९२१बरे झालेले : २९ हजार ७१६पॉझिटिव्हिटी रेट : ३५ टक्के बरे होण्याचे प्रमाण : ८५ टक्के 

१५ एप्रिल ते १ मे 

रुग्ण : ३९ हजार १३९टेस्ट : १ लाख ६८ हजार ९३१ बरे झालेले : ४० हजार ३०८पॉझिटिव्हिटी रेट : २२ टक्के बरे होणाऱ्या प्रमाण : ८७ टक्के 

४ एप्रिल नंतर नाही केला तीन हजारांचा आकडा पार

 शहरात ४ एप्रिलला ३ हजार ३८२ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शहरात अद्यातरी दैनंदिन रुग्ण संख्येच्या आकडा हा तीन हजाराच्या वर गेलेला नाही. त्यामुळे कडक निर्बंधाचा हा फायदा झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस