शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Pimpari: पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम सुरू

By विश्वास मोरे | Updated: July 6, 2024 20:12 IST

Pimpari News:पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे या कामाला भक्ती-शक्तीजवळ सुरुवात झाली. भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात केली आहे.

- विश्वास मोरेपिंपरी  - पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे या कामाला भक्ती-शक्तीजवळ सुरुवात झाली. भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात केली आहे. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंग, संचालक अतुल गाडगीळ, संचालक  विनोद अग्रवाल, कार्यकारी संचालक प्रशासन आणि जनसंपर्क डॉ. हेमंत सोनवणे, किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक  उपस्थित होते.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उत्तर-दक्षिण मार्गिकेवरील पिंपरी चिंचवड ते निगडी (भक्ती शक्ती चौक) या ४.५१९ किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेच्या व्हायाडक्टचे काम दिनांक १५ मार्च २०२४ ला  रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दिले आहे. हा प्रकल्प १३० आठवड्यांत पूर्ण होणार आहे आणि त्यात चार स्थानके असतील: चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती. या मार्गाच्या व्हायडक्त बांधकामासाठी १५१ स्पॅन आणि ११८१ सेगमेंट ची आवश्यकता लागणार आहे.  तळेगाव जवळ सेगमेंट व गर्डर बनावीन्याला सुरुवात केली आहे. धार्मिक स्थळांना जोडणार विस्तार मार्ग पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्रमुख भागांना जोडेल.  चिंचवड स्थानक व्यावसायिक, निवासी, औद्योगिक आणि धार्मिक स्थळे आणि चिंचवड भारतीय रेल्वे स्थानकाशी जोडण्यात येईल. आकुर्डी स्थानक निवासी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांची पूर्तता करेल; निगडी आणि भक्ती-शक्ती स्थानके निवासी, मनोरंजन आणि धार्मिक स्थळे जोडलीत आणि देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या निमशहरी भागांना जोडणाऱ्या शहर बस आगारांशी जोडण्यात येतील. ... पीसीएमसी आणि पुणे या शहरांच्या दरम्यान लोकांची लक्षणीय प्रवासी हालचाल होत आहे आणि या नवीन मेट्रो विभागामुळे देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या उपनगरी भागातील अनेकांना तसेच पीसीएमसी, निगडी आणि आकुर्डी येथील रहिवाशांना सुधारित कनेक्टिव्हिटी मिळाल्याने फायदा होणार आहे. पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागात बसेस, रिक्षा, ई-रिक्षा, सायकली आणि ई-बाईकसह फीडर सेवा या मेट्रो स्थानकांसोबत जोडल्याने प्रवाशांना याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री.शेखर सिंह म्हणाले, “पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गाच्या कामाची आज सुरुवात होत आहे. या मार्गामुळे या विभागातील मोठ्याप्रमाणात असणारा रहिवासी भाग, कारखाने, शाळा, कॉलेज मेट्रोने जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या कामासाठी पीसीएमसी तर्फे सर्वोतपरी मदत करण्यात येईल.”

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर म्हणाले, “पीसीएमसी ते निगडी या विस्तारीत मार्गामुळे या परिसरातील रवासी भाग मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत. नियोजित १३० आठवड्याच्या वेळात हे काम पूर्ण करण्यासाठी मेट्रोने नियोजन केले आहे. आणि त्या अनुषंगाने वेगाने काम सुरु केले आहे.”

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो