शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे गुरव पोलीस चौकी : समस्यांची तक्रार नोंदवायची कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:24 IST

परिसरातील हजारो नागरिकांची सुव्यवस्था ठेवणारी पिंपळे गुरव पोलीस चौकी आहे. ही चौकी अपुऱ्या जागेत आहे. स्वच्छतागृह, वाहन र्पाकिंगचा अभाव, कचरा, पिण्याचे पाणी आदी समस्यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकीला विळखा घातला आहे.

पिंपळे गुरव - परिसरातील हजारो नागरिकांची सुव्यवस्था ठेवणारी पिंपळे गुरव पोलीस चौकी आहे. ही चौकी अपुऱ्या जागेत आहे. स्वच्छतागृह, वाहन र्पाकिंगचा अभाव, कचरा, पिण्याचे पाणी आदी समस्यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकीला विळखा घातला आहे.सांगवी पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळे गुरव पोलीस चौकीचे कामकाज चालते. पिंपळे गुरव गावठाण, सुदर्शननगर, नवी सांगवी भागातील सुव्यवस्था जिजामाता उद्यानातील दोन अपु-या खोल्यांमध्ये अपुºया जागेत सुरू आहे. तीन सहायक पोलीस निरीक्षक, तीन लेखनिक, दोन हवालदार, दोन बीट मार्शल असे दहा कर्मचारी कार्यरत आहेत.पार्किंगची सोय नसल्याने नागरिक चौकीत आल्यानंतर त्यांना आपली वाहने भर रस्त्यावर किंवा पदपथावर उभी करावी लागतात. त्यासाठी प्रशस्त जागेची गरज आहे. पुरुष व महिला तक्रारी देण्यासाठी आल्यानंतर स्वच्छतागृहाचा अभाव असल्यामुळे कुचंबणा होत आहे.गैरसोय : अपुºया जागेमुळे नागरिकांना त्राससांगवी पोलीस ठाण्यांतर्गत या चौकीचे काम चालते. सांगवी पोलीस ठाणेच भाड्याच्या जागेत आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना आणि तेथे येणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तशीच अवस्था पिंपळे गुरव पोलीस चौकीची आहे. या ठिकाणी स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने नागरिकांची आणि कर्मचाºयांची कुचंबणा होत आहे. अपुºया जागेमध्ये पोलिसांना काम करावे लागते. या ठिकाणी असणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु, अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही.पोलीस ठाण्याच्या आवारातच जप्त केलेली वाहने उभी केली जातात. त्यामुळे या ठिकाणी आधीच अपुरी असलेली जागा कमी पडते. या चौकीसाठी नवीन आयुक्तालय झाल्यानंतर तरी जागा मिळेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.पोलीस चौकीसाठी जागा अपुरी आहे. कायमस्वरुपी जागा मिळवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. चौकीचा परिसर स्वच्छ ठेवणार आहे. काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. नागरिकांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देणार आहे. नवीन आयुक्तालयामुळे समस्या सोडविणे सोईस्कर होईल.- संजय निकुंभ, सहायक पोलीस निरीक्षक, पिंपळे गुरव पोलीस चौकीनागरिकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने ताटकळत उभे राहावे लागते. नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी र्पाकिंग आवश्यक आहे. कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करावी. पोलीस चौकीसाठी महापालिकेने कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन द्यावी.- किसन फसके, पिंपळे गुरव

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpale guravपिंपळेगुरव