शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला पळवून नेल्याचा फोन आला अन् पोलिसांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 12:29 IST

पोलिसांनी दाखविली सतर्कता, चुकीच्या माहितीमुळे दमछाक 

ठळक मुद्देपिंपरीतील शाहूनगर येथील प्रकार

पिंपरी : अपहरणाचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून दक्षता घेण्यात येते. त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यास मदतही होते. मात्र काहीवेळा चुकीच्या माहितीमुळे पोलिसांची धावपळ होते, मात्र प्रत्यक्षात गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य घडलेलेच नसते. असाच एक प्रकार चिंचवड येथे नुकताच घडला. तोंडावर स्प्रे मारून सहा ते सात वर्षांच्या मुलाचे दुचाकीवरून अपहरण झाल्याचा फोन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे आला अन् एकच धावाधाव सुरू झाली...एक १७ वर्षीय मुलगा चिंचवड, शाहूनगर येथे रात्री साडेनऊच्या सुमारास दांडिया खेळण्यासाठी जात होता. त्या वेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने एक सुमारे २५ वर्षीय दुचाकीस्वार सहा ते सात वर्षांच्या मुलाला दुचाकीवर पालथे झोपवून घेऊन जात असल्याचे त्याला दिसले. हा नेमका काय प्रकार आहे, याबाबत मुलगा विचार करायला लागला. हे अपहरण तर नाही ना, असा संशय त्याला आला. त्यामुळे १७ वर्षीय मुलाने त्याच्या एका मित्राला सांगितले. मित्राने त्याच्या वडिलांना सांगितले. वडिलांनी नगरसेवकास माहिती दिली. नगरसेवकानेही सतर्कता दाखवून शंभर क्रमांकावर फोन करून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. ‘‘तोंडावर स्प्रे मारून एका सहा ते सात वर्षांच्या मुलाला दुचाकीवर पालथे झोपवून एक तरुण घेऊन जात आहे. शाहूनगर येथे हा प्रकार घडला असून, हा अपहरणाचा प्रकार दिसून येत आहे,’’ असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडून संबंधित पोलीस अधिकाºयांना याबाबत कळविण्यात आले...........पोलीस दाखल होईपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते. प्रत्यक्षदर्शी असलेला १७ वर्षीय मुलगाही घटनास्थळी होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली. अचानक इतके पोलीस बघून त्याची भंबेरी उडाली. काय बोलावे, काय काय सांगावे, असे त्याला काही सूचत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. माझ्या घरच्यांना सांगू नका, नाही तर मला घरचे खूप रागावतील, असे मुलाने सांगितले. पोलिसांनी त्याला धीर दिला. त्यानंतर मुलाने माहिती सांगितली. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासण्यात आले. दहा वाजल्यापासून रात्री साडेबारापर्यंत तपास सुरू होता. मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार घेऊन कोणी आले आहे का, याबाबत सर्व पोलीस ठाण्यांत पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यामुळे अपहरण झालेच नसल्याचे स्पष्ट झाले.,...............सार्वजनिक, तसेच स्वत:च्या सुरक्षेबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला योग्य माहिती द्यावी. जेणेकरून पोलीस यंत्रणेला योग्य दिशेने तपास करणे शक्य होऊन गुन्हे रोखण्यात मदत होईल. - प्रकाश मुत्त्याल, सह पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसKidnappingअपहरण