शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

पदपथाविना पादचारी उपेक्षितच

By admin | Updated: March 22, 2017 03:11 IST

रस्त्यावर पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असे म्हटले जाते. परंतु, हा अधिकार केवळ बोलण्यापुरताच मर्यादित राहिला आहे.

पिंपरी : रस्त्यावर पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असे म्हटले जाते. परंतु, हा अधिकार केवळ बोलण्यापुरताच मर्यादित राहिला आहे. रस्त्याचा हा पहिला मानकरी रस्ते अपघातात सर्वाधिक बळी ठरणारा घटक आहे. पुण्यातल्या रस्त्यांवर वर्षाला साधारणपणे १२0 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे कटू वास्तव आहे. जागोजाग अतिक्रमणांनी वेढलेले पादचारी मार्ग, पदपथ यामुळे नाईलाजास्तव पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालत जावे लागते. नियोजनबद्ध पदपथ असतील तर कदाचित अनेक निष्पापांचे प्राण वाचू शकतील. शहराच्या मध्यवर्ती भागातील निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, दत्तवाडी, मासूळकर कॉलनी आदी रस्त्यांवर पादचारी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या प्रमुख रस्त्यांसह मध्यवर्ती आणि उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आणि बेकायदा पार्किंग होत असल्यामुळे पादचाऱ्यांची अडचण झाली आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवरच्या पदपथावरूनही पादचाऱ्यांना चालत जाण्याची स्थिती सध्या तरी नाही. याकडे महापालिका आणि पोलीस दोघांकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. नित्याचीच झालेली वाहतूककोंडी आणि मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवरच्या या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यांवरुन चालावे लागते. वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दरवर्षी जे अपघाती मृत्यू होतात, त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण पादचाऱ्यांचे असते. त्यासोबतच दुचाकी चालकांच्या मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. पादचारी मार्गांवरुन चालणे कठीण होऊन बसले असून, पदपथांवर आणि लगत लागणारी वाहने, पथारी यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. वयोवृद्ध नागरिक, गरोदर स्त्रिया, अपंग आणि लहान मुलांना जिवाचा धोका पत्करून रस्त्यांवरुन चालत जावे लागते. रस्ता ओलांडण्यासाठी सुयोग्य आखणी केलेले झेब्रा क्रॉसिंगही अनेकदा उपलब्ध नसतात. त्यामुळेही अपघाताचा धोका संभवतो. प्रशासकीय दुर्लक्षाचे बळी ठरत असलेल्या पादचाऱ्यांच्या हक्कांबाबत मात्र नागरिकच उदासीन आहेत. महापालिकेकडूनही अतिक्रमणांवर नाममात्र कारवाई केली जाते. कारवाई नंतर अवघ्या एक-दोन दिवसांतच पुन्हा स्थिती जैसे थे होऊन बसते. पादचारी अनेकदा पथारीवाल्यांशी, अतिक्रमण करणाऱ्यांशी वाद घालतात, मात्र मुजोर दुकानदार, पथारीवाले, पार्किंग करणारे पादचाऱ्यांनाच दमात घेतात.घाईगडबडीत निघालेले दुचाकीचालक तर रस्त्यावर कोंडी झालेली असल्यास थेट वाहने पदपथावरच घालतात. वाहतूक शाखा आणि मनपाने संयुक्त अभियान राबवत पादचाऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, दत्तवाडी, मासूळकर कॉलनी आदी भागांमध्ये त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी तर पादचारी सिग्नल्सच नाहीत. (प्रतिनिधी)