शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीतून ‘पीसीएमटी’ स्वतंत्र, मुख्यमंत्र्यांना विलगीकरणासाठी साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 01:21 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पिंपरी-चिंचवड महापालिका ठरल्याप्रमाणे ४०% निधी देत असतानाही कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही.

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पिंपरी-चिंचवड महापालिका ठरल्याप्रमाणे ४०% निधी देत असतानाही कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. पूर्व पीसीएमटी कर्मचाºयांना दुय्यम वागणूक दिली जाते. शहरासाठी जुन्या बस पाठविल्या जातात. अनेक मार्ग बंद केले आहेत. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीलक्षात घेता पीएमपीचे विलगीकरण करून पीसीएमटी वेगळी करण्यात यावी, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयीचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.पिंपरी (पीसीएमटी) व पुणे (पीएमटी) यांचे २००७ मध्ये एकत्रीकरण होऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ची स्थापना झाली. या कंपनीचा कारभार चालवण्यासाठी पुणे महापालिका ६०% व पिंपरी-चिंचवड महापालिका ४०% निधी देण्याचे ठरले. त्यानुसार २००७ पासून पिंपरी-चिंचवड पालिकेने पीएमपीएमएलला ठरल्याप्रमाणे ४०% रक्कम नियमितपणे अदा केली आहे. तरीही पीएमपीएमएलमधील कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये पिंपरीतील पदाधिकाºयांना विश्वासात घेतले जात नाही.पिंपरी-चिंचवडसाठी बसची संख्या अपुरी आहे. जुन्या बस मार्गावर सोडल्या जात आहेत. वेळेवर बस येत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पीएमपीएमएल कंपनीचे अधिकारी हे पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांना सन्मानपूर्वक वागणूक देत नाहीत. त्यांनी दिलेल्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत. दुजाभावाची वागणूक दिली जात आहे, असे जाधव म्हणाले.गेल्या सहा महिन्यांपासून नियमितपणे ७ ते ८ बसेस दररोज बंद पडण्याचे व बसला आग लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. नागरिकांच्या तक्रारीचा कल आणि स्थानिक प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पीएमपीमधून विलगीकरण करून पीसीएमटी वेगळी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे.- राहुल जाधव, महापौर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड