शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

PCMC :माजी अध्यक्ष अन् पक्षनेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:09 IST

महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती.

पिंपरी  - महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती.सर्वसाधारण सभेत विषय कोणते मंजूर करावेत किंवा नामंजूर करायचे. कोणते दप्तरी दाखल करायचे, कोणते फेटाळून लावायाचे याविषयी पक्षाचा व्हिप काढला जातो. आजच्या सभेत दोन विषयात व्हिपचा गोंधळ झाला. मंजूर करण्याचा विषय तहकूब आणि तहकूब विषय मंजूर करण्यात आला. यावर बोलताना स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे या महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर चिडल्या होत्या.आम्हाला ग्रहित धरू नका : सीमा सावळेमहापालिकेच्या मालमत्तांवर सौर यंत्र बसविण्याचा विषय होता. हा विषय चर्चा करून तहकूब ठेवायचा होता. मात्र, तो मंजूर केला. यावर सावळे म्हणाल्या,‘‘सभा कामकाजाविषयी सदस्यांना व्हिप दिला जातो. तो वारंवार बदलणे योग्य नाही. याची कल्पना द्यायला हवी होती. आम्हाला कोणी गृहित धरू नये. मुर्खात काढण्याचा प्रकार आहे. आम्ही काय वेडे आहोत. ही बाब चुकीची आहे. नगरसेवकांना विश्वासात घेऊन धोरण अवलंबले जावे.’’आयत्यावेळी घुसडले विषयमहापालिकेच्या तहकूब सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपाने आज आयत्यावेळी विषय घुसडले. त्यावर माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेतला. कोणत्या नियमाच्या आधारे तहकूब सभेत विषय दाखल करून घेतले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महापालिकेची सप्टेंबर महिन्याची तहकूब सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.सप्टेंबरच्या सभेत तातडीची बाब म्हणून पिंपरी विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार, मृत मतदारांची नावे वगळण्याचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर महापालिकेतील एका नगरसेवकाची नियुक्ती करण्याचा, असे तीन विषय आयत्यावेळी दाखल केले होते. कुत्र्यांच्या प्रश्नावरून गोंधळ झाल्याने सभा तहकूब झाली होती. तहकूब सभा आज झाली.विषयपत्रिकेवरील २४ आणि आयत्यावेळी दाखल करून घेतलेल्या दोन अशा २६ विषयांना मान्यता दिली. त्यानंतर आणखीन तीन विषयांना मान्यता देण्यास सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली. याला माजी महापौर कदम यांनी आक्षेप घेतला. संबंधित विषय आयत्यावेळी घेतले, त्याची नगरसेवकांना माहिती दिली नाही. नगरसेवकांना अंधारात ठेवून विषय मंजूर करणे अत्यंत चुकीचे आहे. तहकूब सभेत विषय कसे दाखल करून घेतले जातात? असा प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या,‘‘सत्ताधारी आणि प्रशासन चुकीच्या पद्धतीने विषय घुसडून मंजूर करून घेतात. ही बाब नियमबाह्य आहे.’’विकासाला प्राधान्यसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले,‘‘केंद्राकडून काही प्रकल्प राबविण्यात येतात. त्या विषयांची निकड किती आहे. यावरून विषयांचा प्राधान्यक्रम ठरविला जातो. शहराच्या विकासासाठी केंद्राचे काही प्रकल्प असतील तर त्याविषयी प्रशासनाकडून माहिती घेऊन विषयाचे नियोजन केले जाते. यात सदस्यांना माहिती न देण्याचा विषयच येत नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या