शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गावे समाविष्ट, पवना जलवाहिनी, शास्ती रद्दवर होणार सोमवारी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 02:22 IST

पिंपरी शहरातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सोमवारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ होणार आहे.

पिंपरी  - शहरातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सोमवारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ होणार आहे. अवैध बांधकामे, शास्तीकर, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, महापालिका हद्दीवरील पश्चिमेकडील गावे महापालिकेत समाविष्ट होण्यावर निर्णय होणार आहे.चिंचवड येथे झालेल्या महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकराचा प्रश्न १५ दिवसांत सोडवू, तसेच पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावर मुख्यमंत्री दुपारी चारला आढावा घेणार आहेत. यामध्ये भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार बाळा भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम २००९ मध्ये सुरू केले होते. प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध करत आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. यामध्ये तीन शेतकरी शहीद झाले आहेत. आंदोलनानंतर सरकारने प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार आहे.अवैध बांधकामावर आकारण्यात आलेला शास्तीकर याची माहिती घेणार आहेत. गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे, सांगवडे ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आहे. तसेच महापालिकेचा आकृतिबंध, अत्यावश्यक आणि आवश्यक असलेली सरळ सेवेतील रिक्त पदे भरणे, एचएच्या ताब्यातील अतिरिक्त ५९ एकर जमीन बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित करावे, असे विविध विषय आहेत.महसूल विभागाकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, पुनावळे येथील राखीव घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठीची राखीव जागा, संरक्षण विभागाच्या जागा, महसूल आणि वन विभागाकडून महापालिकेकडे जागा हस्तांतरणाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये तळवडे, दिघी, मोशी, चिखली येथील जागाबाबत चर्चा केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत. त्यामध्ये ताथवडे, नियोजित मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठीची आरक्षित जागा, थेरगाव व ताथवडे येथील ४५ मीटर रस्त्याची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करावी, असे विषय आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड