PCMC: नागरी सुविधांची माहिती 'सिटीझन जिओ पोर्टल'वर मिळणार एका क्लिकवर!

By विश्वास मोरे | Published: October 12, 2023 04:24 PM2023-10-12T16:24:25+5:302023-10-12T16:24:57+5:30

नागरिकांना एका क्लिकवर सेवांची माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली....

PCMC: Information about civic facilities on 'Citizen Jio Portal' in one click! | PCMC: नागरी सुविधांची माहिती 'सिटीझन जिओ पोर्टल'वर मिळणार एका क्लिकवर!

PCMC: नागरी सुविधांची माहिती 'सिटीझन जिओ पोर्टल'वर मिळणार एका क्लिकवर!

पिंपरी : नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ करण्यासाठी महापालिका व स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने जीआयएस इआरपी प्रणाली सुरू केली आहे. सिटीझन जिओ पोर्टल सुरू केले आहे. नागरिकांना एका क्लिकवर सेवांची माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, या प्रकल्पामध्ये ६ सॅप मॉड्यूल्स, २५ नॉन-कोर आयटी अॅप्लिकेशन्स, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा समावेश आहे. नागरिकांना सेवा-सुविधांची माहिती व ठिकाणे नकाशावर एका क्लिकवर पाहता येणार आहेत. संकेतस्थळावर आपले शहर जाणून घ्या आयकॉनअंतर्गत उपलब्ध आहे, यातून शहरातील लहान रस्त्यांची व ठिकाणांची माहिती नागरिकांना होणार आहे.

काय मिळणार माहिती

१) रुग्णालयांची ठिकाणे, आरोग्य सेवेची माहिती.
२) फायर ब्रिगेड स्टेशन्सची आपत्कालीन सेवेची माहिती.

३) सरकारी शाळांची ठिकाणे, क्रीडा सुविधा, पर्यटन आणि प्रमुख ठिकाणे, सामुदायिक सेवा, सरकारी कार्यालये, मेट्रो आणि बीआरटीएस थांब्यांची ठिकाणे, रेल्वे स्थानके.

मिळणार या सुविधा-

१) दोन ठिकाणांमधील अंतर, जागांचे क्षेत्रफळ मोजता येणार आहे.

२) पोर्टलवर पीसीएमसी सुविधा बुकिंग पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यावरून नागरिक क्रीडा मैदान, बॅडमिंटन हॉल आदी सुविधा बुक करू शकतात.
३) कोणत्याही स्थानाचा शोध घेऊन लहान मार्गाची गणना करण्यासाठी नेव्हिगेशन सिस्टम तयार केली आहे.

४) नागरिक निवडलेल्या नकाशाची प्रिंट घेऊ शकतात. नागरिक मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये जिओ पोर्टलवर माहिती पाहू शकतात.

जीआयएस सक्षम एकात्मिक इआरपी प्रकल्प हा भारतातील पहिला प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महापालिकेचे सर्व विभाग भौगोलिक माहिती प्रणालीसोबत ‛इंटरप्रायजेस रिसोर्सेस प्लॅनिंगद्वारे एकत्रित केले आहेत. ज्यामुळे शहरातील विविध भू-स्थानिक माहितीचा सर्वात चांगल्या प्रकारे वापर करू शकेल.

- शेखर सिंह, आयुक्त

Web Title: PCMC: Information about civic facilities on 'Citizen Jio Portal' in one click!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.