शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

PCMC: ऑनलाईन कर भरण्यास ५५ टक्के नारिकांचे प्राधान्य; वाकडमधून सर्वाधिक मिळकतकर

By विश्वास मोरे | Updated: April 2, 2024 16:18 IST

सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त ८ हजार ५२७ मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे....

पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने आर्थिक वर्षात ९७७ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच ८७ टक्के मिळकत कर वसूल करण्यात यश आले आहे. वाकड झोनमधून १५४ काेटींचा उच्चांकी कर वसूल झाली आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त ८ हजार ५२७ मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे.

ऑनलाईन कर भरण्यास ५५ टक्के नारिकांचे प्राधान्य मिळकत कर हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  प्रमुख स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत ६ लाख २५ हजार मालमत्ता आहेत. यापैकी ५ लाख ११ हजार १५४ मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी ८१६ कोटींचा कर वसूल केला होता. यंदा १६१ कोटींचा अधिक कर वसूल केला आहे. 

पहिल्यांदाच ९७७ काेटीं उत्पन्न दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता सील.८७  टक्के चालू कर वसूल ४९ टक्के थकीत कर वसूल 

वाकडमधून मिळाले १५४ काेटीमहापालिकेचे कर संकलनासाठी १७ झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे ६८ हजार मालमत्ता धारकांनी १५४ काेटी ५८ लाख रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल सांगवीत ५१ हजार ७१८, चिखलीत ४५ हजार ६३४, थेरगावमध्ये ४५ हजार ४३४, चिंचवडमध्ये ४३ हजार २८६, माेशीत ३४ हजार ९८०, भाेसरीत ३३ हजार ८६७ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये ८ हजार ५२७ मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे. 

ऑनलाईन - ५५४ कोटी ५९ लाख  रोख    - १३७ कोटी ४९ लाख धनादेशाद्वारे - १६६ काेटी ५७ लाखईडीसी - १३ काेटी ८१ लाख आरटीजीएस -४४ कोटी ७६ लाख डीडी - ८ काेटी ५७ लाख विविध ॲप - १० कोटी २ लाखएनएफटी - ६ काेटी ९३  लाख

मिळकत कराच्या एक हजार कोटींच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचलो आहे. याचे समाधान आहे. कराचा विनियोग हे शहर उत्तम शाश्वत विकासाचे मॉडेल होण्यासाठीच वापरला जाईल. पुढील वर्षात सर्वेक्षणातील सर्व नवीन मालमत्तांची कर आकारणी करणे, करविषयक सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग, डीजिटायझेशन करून  हा विभाग संपूर्णतः लोकाभिमुख होईल याचा प्रयत्न राहील. 

- शेखर सिंह, आयुक्त

कर संकलन विभागाने नियोजन केले. त्यामुळे हा टप्पा गाठू शकलेलो आहोत. मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेली जप्ती मोहीम आणि यंदा जप्ती केलेल्या मालमत्तांची प्रथमच राबवलेली लिलाव प्रक्रिया याचाही कर संकलनाला उपयोग झाला आहे. - नीलेश देशमुख, सहायक आयुक्त

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका