शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

पवार, ओवैसी, पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करावेत  : विहिंपच्या मिलिंद परांडेंची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 21:44 IST

शरद पवार, ओवैसी, वारिस पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी शुक्रवारी पिंपरीतील पत्रकार परिषदेत केली आहे.

पिंपरी : मशिदीसाठीच्या न्यास निर्माणाचा विषय शरद पवार यांनी अनावश्यकपणे समोर आणला आहे. यावरून त्यांच्या जबाबदार व्यक्तिमत्त्वातील बेजबाबदारपणा दिसून येतो. यामुळे नवीन विवादाचे मुद्दे निर्माण करून समाजातील तेढ जाणीवपूर्वक वाढवली जात आहे. सीएएला मुस्लिम तसेच हिंदू अल्पसंख्याक विरोध करतील असा डाव आखला जात आहे. शरद पवार, ओवैसी , वारिस पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी शुक्रवारी पिंपरीतील पत्रकार परिषदेत केली आहे.

सीएए, एनआरसी या विषयांवर विश्व हिंदू परिषदेची भूमिका मांडण्यात आली. या वेळी पश्चिम प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र देवी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजय देशपांडे, विभाग मंत्री नितीन वाटकर आदी या वेळी उपस्थित होते. ‘‘सध्या सीएए व एनआरसी विरोधात देशात आंदोलन चालू आहेत, त्यामागे देशद्रोही विचारांची यंत्रणा काम करत आहे. याला आळा बसवायचा असेल तर शाहीनबाग व इतर देशविरोधी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांवर व पक्षश्रेष्ठींवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी परांडे यांनी केली आहे.

परांडे म्हणाले,  ‘‘सीएएच्या विरोधामध्ये जे हिंसक आंदोलने देशभर सुरू आहेत, त्यापाठीमागे काही अल्पसंख्याक तुष्टीकरण करणाऱ्या  राजनीतिक दल, साम्यवादी दल व शक्ती, हिंसक मुस्लिम संघटन आणि मुस्लिम समाजाच्या एका मोठ्या गटाचा हात स्पष्टपणे दिसतो आहे. जे तथाकथित अहिंसक आंदोलनात ज्याप्रकारे देशविरोधी, हिंदूविरोधी घोषणा व भाषणे सुरू आहेत त्यात देशविरोधी शक्तीसुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत. अशा सर्व प्रकारच्या हिंसक व देशविरोधी आंदोलनांची विश्व हिंदू परिषद निंदा करते. कायदा हातात घेणाऱ्या व तोडणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. काल-परवाच्या सभेत वारिस पठाणने जे बेमालूम वक्तव्य केलं, त्यातून या समाजाची विखारी भावना दिसून येत आहे. अशा नेतृत्वाला मुस्लिम समाजाने थारा देऊ नये, नाही तर हिंदू समाज गप्प बसणार नाही.’’

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारHinduहिंदूAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीWaris Pathanवारिस पठाण