पालखी सोहळा: स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 05:03 AM2018-07-03T05:03:05+5:302018-07-03T05:04:09+5:30

श्री क्षेत्र देहूतून संत तुकाराम महाराज पालखी ५ जुलैला तर संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी आळंदीतून ६ जुलैला प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीसाठी संतांच्या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होणार असल्याने उद्योगनगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

 Palakhi Sawal: Ready to enter the industry | पालखी सोहळा: स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज

पालखी सोहळा: स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज

googlenewsNext

पिंपरी : श्री क्षेत्र देहूतून संत तुकाराम महाराज पालखी ५ जुलैला तर संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी आळंदीतून ६ जुलैला प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीसाठी संतांच्या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होणार असल्याने उद्योगनगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे देहूतून प्रस्थान इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी पालखी विसावते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याचे उद्योगनरीत आगमन होते. भक्ती-शक्ती चौक निगडी येथे पालखी सोहळ्याच्या स्वागताची महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. त्याठिकाणी स्वागत कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे. तेथे स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच पालखी मार्गावर स्वच्छता राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवडमधून मार्गस्थ होतो, त्या दिवशी श्री क्षेत्र आळंदीहून प्रस्थान ठेवलेला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे महापालिका हद्दीत दिघी येथे आगमन होते. त्यामुळे या परिसरातही पालखी मार्गावर स्वच्छता राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. महापालिकेचे अ, फ, क आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी
यांना पालखी मार्गावर सोई,
सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंढरपूरपर्यंत टँकर
महापालिकेने वारकºयांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, कोणाचीही पाण्यासाठी गैरसोय होऊ नये. यासाठी संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याबरोबर देहू ते पंढरपूरपर्यंत दोन टँकर उपलब्ध करून दिले आहेत. वारकºयांच्या बरोबर पाणीपुरवठा करणारे टँकर पंढरपूरपर्यंत नेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज
पालखी सोहळा शहरातून पुढे मार्गस्थ होईपर्यंत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. महत्त्वाचे चौक, ठिकाणे वारकºयांचे विसाव्याचे ठिकाण येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पालखी सोहळा कालावधीसाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.

Web Title:  Palakhi Sawal: Ready to enter the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.